जाहिरात

Big News: बोगस शालार्थ आयडी प्रकरणात वैशाली जामदार यांना अटक

राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.

Big News: बोगस शालार्थ आयडी प्रकरणात वैशाली जामदार यांना अटक
नागपूर:

संजय तिवारी 

शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपूर पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीने आणखी एका मोठ्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. नागपूरच्या शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालक व छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्यात अटक झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. गुरुवारीच पोलिसांनी नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांना देखील अटक केली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी' घोटाळ्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. आतापर्यंत शिक्षण विभागातील आठहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. शिवाय  एका शिक्षकाला ही अटक झाली आहे. पोलीसांनी तीन दिवसां पूर्वी  लक्ष्मण उपासराव मंघाम याला अटक केली होती. तो अगोदर शिक्षण उपसंचालक कार्यालयात लिपिक होता. 2019 सालापासून तो बनावट शालार्थ आयडी तयार करत होता. 

ट्रेंडिंग बातमी - Chhagan Bhujbal: 'नाराज होतो, भाजपमध्ये जावू शकलो असतो' भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

यासाठी तो कार्यालयाच्या बाहेरील संगणकांचा वापर करत होता. त्याच्या चौकशीत त्याने अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत. दोन दिवसातच चिंतामण वंजारी यांना अटक करण्यात आली. तर शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथून वैशाली जामदार यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना चौकशीसाठी नागपुरात आणण्यात येत आहे. या कारवाईमुळे आता राज्यभरातील अधिकारी हादरले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Navi Mumbai News: चमत्कार! 15 मिनिटे हृदय बंद, तरीही जीव वाचला, हे कसं शक्य झालं?

दरम्यान, चिंतामण वंजारीला 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. वैशाली जामदार या नागपुरात 2021 साली उपसंचालक होत्या. 2019 पासून शालेय शिक्षण विभागात बोगस शालार्थ आयडी जारी झाल्याची बाब आतापर्यंतच्या चौकशीत समोर आली आहे. जामदार यांच्या कार्यकाळातदेखील असे प्रकार झाले असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. त्या सध्या छत्रपती संभाजीनगरात कार्यरत आहेत. त्यांना पोलिसांनी चौकशीला अगोदर देखील बोलविले होते. मात्र दहावी-बारावीच्या निकालांचे कारण देत त्यांनी नागपुरात येण्याचे टाळले होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com