फडणवीस, गिरीश महाजन, बावनकुळे, विखे पाटील यांसारखे बडे नेते अडचणीत; रोहित पवारांचा मोठा दावा

यंदा महाराष्ट्रात निवडणुकीचा अनपेक्षित निकाल लागणार आहे. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे असे नेते अडचणीत आहेत. भाजप महायुतीचे मोठे नेते निवडून येतील की नाही असा प्रश्न आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी, पंढरपूर

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वच नेतेमंडळी विजयाचे आणि मोठमोठे दावे-प्रतिदावे करत आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही मोठा दावा केला आहे.

यंदा महाराष्ट्रात निवडणुकीचा अनपेक्षित निकाल लागणार आहे. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे असे नेते अडचणीत आहेत. भाजप महायुतीचे मोठे नेते निवडून येतील की नाही असा प्रश्न आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - प्रियांका गांधींनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमधलं साम्य, पाहा VIDEO

भाजप आणि महायुतीचे अनेक नेते आपल्या मतदारसंघात अडकून आहेत. गिरीश महाजन ,चंद्रशेखर बावनकुळे, विखे पाटील, राम शिंदे असे सर्व मोठे नेते अडचणीत आले आहेत. देवेंद्र फडणवीस तर आपल्याच मतदारसंघात वेळ घालवत आहेत. त्यामुळे भाजपचे मोठे नेते अडचणीत आल्याने ते निवडून येणार नाहीत, असा दावा आता आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 170 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा देखील दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी तीन लाखापर्यंत कर्जमाफी त्वरित दिली जाईल असं देखील आश्वासन रोहित पवार यांनी दिलं आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - भन्नाट हिंदी , सॉलिड कविता! प्रियांका गांधींची सभा घोगरे काकींनी गाजवली

अमोल कोल्हेंचा फडणवीस, अजित पवारांवर निशाणा

देवेंद्र फडणवीस हुशार माणूस आहे. त्यांनी स्वतः कबुली दिली मी मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये नाही. कारण तुमचं सरकारच येणार नाही तर तुम्ही मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये कसे असणार, असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला. कितीही गुलाबी रंग असला तरी गुलाबी रंगाने गद्दारीचा कलंक झाकला जात नाही, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.