लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी: राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. विधानसभेचा प्रचार रंगात आला असून राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री आणि जालन्यातील परतूर विधानसभेचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या एका विधानाने नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा समाजाची कांड्यावर मोजण्याइतकी मते आहेत, असे धक्कादायक विधान बबनराव लोणीकर यांनी केले आहे. जालन्यातील एका गावामध्ये प्रचार सभेत ते बोलत होते. या भाषणाचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.
काय म्हणालेत बबनराव लोणीकर?
"मराठा समाजाची कांड्यावर मोजण्याइतकी मते असल्याचे धक्कादायक वक्तव्य जालन्यातील परतूरचे भाजप उमेदवार बबनराव लोणीकर यांनी केले आहे. या वक्तव्यावरुन आता राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बबनराव लोणीकर हे परतूर मंठा विधानसभेचे भाजपचे उमेदवार आहेत..परतूर तालुक्यातील आष्टीमध्ये बबनराव लोणीकरांकडून प्रचार सुरु होता. यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केले. 'या गावात अठरा पगड जातीचे लोक आहेत. मराठा समाजाची कांड्यावर मोजण्याइतकी मते आहेत. मात्र हे गाव सर्व समाजाचे गाव आहे. सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत,' असं ते म्हणाले.
नक्की वाचा: 'काँग्रेस, उबाठा, शरद पवारांचे पोपट', देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी
वादानंतर स्पष्टीकरण..
"या विधानावरुन राजकारण तापल्यानंतर आता बबनराव लोणीकर यांनी आपल्या सारवासारव करण्याचा प्रयत्न केले. 'आज आष्टी गावात अभूतपुर्व अशी रॅली झाली. या मिरवणुकीमध्ये संपूर्ण शहर सहभागी झाले होते. खेड्यापाड्यातील ३ हजार पेक्षा जास्त लोक आले होते. यावेळी आष्टीचे कौतुक करताना मी या गावात मराठा समाजाची मते कमी आहेत, असं मी म्हणालो. हे गाव अठरा पगड जातीचे असणारे गाव आहे. ४० वर्ष या गावाने भारतीय जनता पक्षाला लीड दिले. मात्र काँग्रेसमधील हकालपट्टी केलेल्या काही जणांनी मोडतोड करुन व्हिडिओ समोर आणला, तो खोटा आहे," असे स्पष्टीकरण लोणीकर यांनी दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world