अजित पवार गटातील बड्या नेत्याच्या मतदारसंघावर भाजपचा दावा; 'नोटा'ला मतदान करण्याचा इशारा

Latur Politics : सध्या भाजपकडे औसा, निलंगा हे मतदारसंघ आहेत. तर महायुतीतील अजित पवार गटाकडे उदगीर आणि अहमदपूर मतदारसंघ आहेत. मात्र आता उदगीर मतदारसंघात विद्यमान मंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आता बंड पुकारले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील कांबळे, लातूर

विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावधीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. जागावाटपाबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना बैठका देखील सुरू आहे. लवकरच जागावाटप देखील जाहीर होईल. मात्र जागावाटपाआधीच मतदारसंघामध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघातही हेच चित्र सध्या दिसत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून या जागेवर दावा केला जात आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आगामी विधानसभाभारत विकसित संकल्प यात्रेतून दिलीप कुमार गायकवाड हे उदगीर विधानसभेमध्ये झंजावात दौरा करत आहेत. मोदी सरकारने केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा ते जनतेसमोर मांडत आहेत. त्याचबरोबर महायुतीतील अजित पवार गटाकडे असलेला उदगीर मतदारसंघ आता भाजपाला मिळावा, असा दावा भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चाचे दिलीप कुमार गायकवाड यांच्याकडून केला जात आहे.

(नक्की वाचा-  महायुतीचं जागावाटप सप्टेंबर महिनाअखेर पूर्ण होण्याची शक्यता, काही जागांचा तिढा दिल्लीत सुटणार?)

सध्या भाजपकडे औसा, निलंगा हे मतदारसंघ आहेत. तर महायुतीतील अजित पवार गटाकडे उदगीर आणि अहमदपूर मतदारसंघ आहेत. मात्र आता उदगीर मतदारसंघात विद्यमान मंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आता बंड पुकारले आहे. उदगीर मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक गड असल्याचं कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. 

(नक्की वाचा- अमित शहांचेही कापले होते तिकीट, त्यावेळचा किस्सा काय? अमित शहांनी स्वत: सांगितलं)

आगामी काळात उदगीर विधानसभा ही भाजपला नाही सुटल्यास नोटाला मतदान करण्याचा इशारा सुद्धा भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने केलेल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोख जनतेच्या समोर मांडण्याचा सपाटा सध्या भाजप कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. 

Advertisement

पाहा VIDEO

Topics mentioned in this article