Dhule News: भाजप नेत्याच्या मुलाची आत्महत्या; वाढदिवसानंतर दोनच दिवसात असं काय घडलं?

Dhule News: विराजने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जाहिरात
Read Time: 2 mins

नागिंद मोरे, धुळे

Dhule News: धुळे शहराला एका दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने हादरवून सोडले आहे. धुळे महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे यांचा मुलगा विराज सोनल शिंदे (वय 20) याने स्नेहनगर येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना काल रात्री उशिरा उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेचे सर्वात दुःखद बाब म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच विराजने आपला वाढदिवस कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला होता. वाढदिवसाच्या आनंदाचे वातावरण असतानाच त्याच्या अशा अचानक मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

(नक्की वाचा-  Pune News: 'सासऱ्याशी शरीर संबंध ठेव', पती अन् सासूचा सुनेवर दबाव, निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात भयंकर कांड)

घटनेच्या दिवशी विराज घरी एकटाच होता. त्याचे कुटुंबीय बाहेर गेले असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. काही वेळाने कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ विराजला जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याचा मृत्यू आधीच झाल्याचे जाहीर केले.

(नक्की वाचा-  4 महिन्यापूर्वी लग्न, सासरचा जाच, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी टोकाचं पाऊल, लेकीसाठी आई-बापाचा हंबरडा)

विराजने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धुळे शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस आता या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत. कुटुंबीय आणि मित्रांची चौकशी केली जात असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. विराजच्या आत्महत्येमुळे धुळ्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Advertisement

Topics mentioned in this article