स्वानंद पाटील, बीड
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील संरपंच संतोष पांडुरंग देशमुख यांच्या हत्येचे राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहेत. आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एक गंभीर विषय उचलला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे असलेल्या‘मास्तरमाईंड' वर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संतोष पांडुरंग देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आहे. काही दिवसांपूर्वी संतोष यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या ‘मास्तरमाईंड' चा शोध घेण्यासाठी विशेष तपास यंत्रणा (SIT) नेमण्याची मागणी केली जात आहे. संबंधित ‘मास्तरमाईंड' ने अनेक वेळा कायद्याचा गैरवापर करून स्थानिकांवर अन्याय केला असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - खेळता खेळता खाली कोसळली, जीवानिशी गेली, 15 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत काय झालं?
आमदार सुरेश धस यांची मागणी काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हत्याकांडाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी. हत्येच्या कटाशी संबंधित ‘मास्तरमाईंड' ची ओळख पटवून त्याला न्यायालयासमोर उभे करावे. तसेच स्थानिकांमध्ये वाढत असलेल्या असुरक्षिततेच्या भावना कमी करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.
(नक्की वाचा : शरद पवार- अजित पवारांची दिल्लीत भेट! काय झाली चर्चा? दादा म्हणाले...)
भाजपचेच आमदार असलेले सुरेश धस यांनी राज्य सरकारकडे ही मागणी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्य सरकारवर हत्याकांडातील मुख्य आरोपीवर कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकार या प्रकरणावर काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.