जाहिरात

Black Magic: मध्यरात्री आला, घरासमोर मोहरी टाकली अन्... जादूटोण्याच्या प्रकाराने नागरिक भयभीत

लोकांच्या घरासमोर मोहरी टाकून जादूटोणा केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला असून या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Black Magic: मध्यरात्री आला, घरासमोर मोहरी टाकली अन्... जादूटोण्याच्या प्रकाराने नागरिक भयभीत

छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अंधश्रद्धेतून अघोरी पूजा, जादूटोणा केल्याच्या विविध घटना समोर येत आहेत. कोल्हापूरमध्ये अघोरी पूजेचा प्रकार घडल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. अशातच आता छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकांच्या घरासमोर मोहरी टाकून जादूटोणा केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला असून या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, घरासमोर पांढरी मोहरी टाकून जादूटोणा करण्यात येत असल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात समोर आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकाराने परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या प्रकरणी एका संशयितवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 सुभाष बळिराम पिंजरकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार, शनिवारपासून त्यांच्या घराच्या ओट्यावर अज्ञात व्यक्तींकडून पांढरी मोहरी टाकली जात होती. दहा जून रोजी पौर्णिमेच्या रात्री अकराला, तर अकरा जूनला सकाळी सहाला पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याचे समोर आले. शेजारी राहणाऱ्या रामराव काकडे यांच्या घराचा सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता, हेल्मेट घातलेली एक व्यक्ती दुचाकीवर  या भागात येत मोहरी टाकताना दिसली.

Miraj News: 3 दिवस, 3 रंग, 3 गाठोडी! वाढदिवसाच्या बॅनर खाली जादूटोणा

या दुचाकीचा शोध घेतला असता, तिचा मालक गजानन शेकोकार असल्याचे समोर आले. यापूर्वी देखील पिंजरकर यांच्या नातेवाईकांच्या घरासमोरही अशाच प्रकारे पांढरी मोहरी आढळली होती. संशयित शेकोकार अनेक घरांसमोर मोहरी टाकून जादूटोणा करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. असा प्रकार कोणत्या हेतूने करण्यात आला? याबाबत अद्याप स्पष्टता झाली नसून याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com