Mumbai News: महापालिकेची मोठी कारवाई! माटुंगा रेल्वे स्थानक परिसरातील 52 दुकाने हटवली

Mumbai News: कारवाईसाठी सुमारे 105 मनुष्यबळासह 2 जेसीबी व 6 डंपर आणि 2 अन्य वाहने तैनात करण्यात आली होती. तसेच पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामे, दुकानांवर कडक कारवाई करण्याचा धडाका सुरु आहे. मागील आठवड्यामध्येच मुंबई पालिकेकडून साकीनाका परिसरात मोठी कारवाई करत हॉटेल्स, विश्रामगृह हटवली होती. त्यानंतर आज माटुंगा रेल्वे स्थानक आणि फुल बाजार परिसरातील 52 दुकानांवर पालिकेकडून निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माटुंगा रेल्वे स्थानक आणि भांडारकर मार्गावरील फुल बाजार परिसरातील 52 अनधिकृत दुकानांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ (उत्तर) विभागाच्या वतीने आज (दिनांक 06 मार्च 2025) निष्कासनाची कारवाई करण्यात आली. 

  उप आयुक्त (परिमंडळ-२) श्री. प्रशांत सपकाळे, एफ (उत्तर) विभागाचे सहायक आयुक्त श्री. नितीन शुक्ला यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. माटुंगा रेल्वे स्थानक आणि भांडारकर मार्गावरील फुल बाजार परिसरात पदपथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकाम होत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर, एफ (उत्तर) विभागाच्या वतीने निष्कासन मोहीम हाती घेण्यात आली.

नक्की वाचा - Bhaiyyaji Joshi : 'मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही', संघाच्या वरिष्ठ नेत्याच्या वक्तव्याने वाढ उफाळणार?

या अंतर्गत सुमारे 300 मीटर परिसरातील अनधिकृत 22  दुकाने तसेच अतिक्रमण करण्यात आलेली 30 दुकाने निष्कासित करण्यात आली. परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी सुमारे 105 मनुष्यबळासह 2 जेसीबी व 6 डंपर आणि 2 अन्य वाहने तैनात करण्यात आली होती. तसेच पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता. 

Who Is Satish Bhosale: पैशांची उधळण अन् हेलिकॉप्टरने एन्ट्री, बीडमध्ये दहशत माजवणारा 'खोक्या' नेमका आहे कोण?