Raj Thackeray and Uddhav Thackeray BMC Election Manifesto: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधुंनी आज आपला वचननामा प्रसिद्ध केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मनसे, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशा तिन्ही पक्षांचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यामध्ये ठाकरे बंधुंनी मुंबईकरांसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयं-रोजगार अर्थसाह्य योजना, खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास, १० रुपयांत नाष्ता अशा नाविण्यपूर्ण योजनांचे आश्वासन दिले आहे.
ठाकरे बंधुंचा वचननामा: 10 महत्त्वाचे मुद्दे
1. मुंबईची जमीन मुंबईकरांच्या घरांसाठीच: महापालिकेच्या मालकीच्या जमिनी खासगी विकासकांच्या घशात न घालता तिव्ये मुंबईकरांची सेवा करणा-या शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तसंच गिरणी कामगारांना हक्काची घरे देणार.
2. 10 रुपयांमध्ये नाश्ता जेवण: कष्टकरी मुंबईकरांसाठी फक्त १० रुपयांत नाश्ता आणि दुपारचं जेवण देणारी माँसाहेब किचन्स सुरू करणार.
3. गृहनिर्माण प्राधिकरण: पुढील ५ वर्षांत १ लाख मुंबईकरांना परवडणारी हक्काची घरं दिली जातील.
4. मुंबईकरांचा स्वाभिमान: घरकाम करणा-या महिलांची नोंदणी करणार आणि नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला रू.१,५०० स्वाभिमान निधी देणार.
5. वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयं-रोजगार अर्थसाह्य योजना: एक लाख तरुण-तरूणींना प्रत्येकी २५ हजार ते १ लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहाय्यता निधी आणि २५ हजार गिग वर्कर्सना आणि डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज देणार.
MNS Shivsena UBT Menifesto: मुंबईकरांसाठी शब्द ठाकरेंचा! शिवशक्ती वचननाम्यातून मोठ्या घोषणा
6. १०० युनिटपर्यंत वीज मोफत: घरगुती वीज वापर करणाऱ्या 'बेस्ट विद्युत' च्या ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देणार. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये बेस्ट विद्युतच्या विस्तारीकरणासाठी विशेष योजना आखणार.
7. खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास: तिकीट दरवाढ कमी करून रू. ५-१०-१५-२० फ्लॅट रेट ठेवणार. बेस्टच्या ताफ्यात १०,००० ईलेक्ट्रिक बस तसंच २०० डबल डेकर ईलेक्ट्रिक बसचा समावेश करणार. जुने मार्ग पुन्हा सुरू करणार. महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास.
8. रोजगार: मुंबई महापालिकेतील अत्यावश्यक रिक्त पदं भरणार: महापालिकेच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑन-साइट अॅप्रेंटिसशीप देऊन मराठी तरूण-तरूणींना कामाचा अनुभव देणार.मुंबईत रोजगारासाठी येऊ इच्छिणाऱ्या मराठी तरुण-तरुणींसाठी वसतिगृह उभारणार. महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात यूपीएससी आणि एमपीएसीच्या विद्यार्थ्यांसाठी सी. डी. देशमुख प्रशिक्षण केंद्र सुरु करणार.
9. मैदाने: छत्रपती शिवाजी महाराज पार्कसारखी चांगली मैदानं, उद्यानं उभी केली जातील. जिथे नागरिकांना बसण्यासाठी कट्टे असतील. ती मैदानं भिंतींनी झाकली जाणार नाहीत. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असतील तसंच प्रत्येक वार्डात एक, आजोबा-आजी उद्यान असेल.
10. आरोग्य: दीड कोटी लोकसंख्येच्या मुंबईतील रूग्णांचा भार समर्थपणे पेलण्यासाठी आणि आरोग्य सेवांचा विस्तार करण्यासाठी मुंबईत आणखी पाच वैद्यकीय महाविद्यालयं (शताब्दी-गोवंडी, शताब्दी-कांदिवली, एम.टी. अग्रवाल-मुलुंड, भगवती- बोरिवली, राजावाडी-घाटकोपर येथे) सुरू करणार.
11. रॅपिड बाईक मेडिकल असिस्टंन्स (अॅम्ब्युलन्स) सेवा: मुंबईकरांना रॅपिडोच्या बाईकची नव्हे तर वाहतूककोंडीच्या तासांमध्येही अगदी गल्लीबोळात सहज आणि वेळेवर पोहोचेल अशा रॅपिड बाईक मेडिकल असिस्टंन (अॅम्ब्यूलन्स) सेवेची आवश्यकता आहे. गंभीर रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तसंच हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक आलेल्या रुग्णांना प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी (पॅरामेडिकल स्टाफ) बाईकवर उपलब्ध असलेल्या जीवनरक्षक उपकरणांच्या (हार्ट शॉक मशीन - Defibrillator, ऑक्सिजन, नेब्यूलायजर आदींच्या) सहाय्याने 'गोल्डन अवर' मध्ये प्राथमिक उपचार करतील आणि रुग्णाला लवकरात लवकर नजीकच्या रुग्णालयात पोहोचवतील.
12. युवा मुंबईकर: प्रत्येक वॉर्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. जुन्या व्यायामशाळांच्या दुरुस्तीसाठी सहकार्य. मुंबईत आयोजित म्युझिक कॉन्सर्ट आणि आयपीएल सामन्यांसाठी 'मुंबईकर स्टैंड' मध्ये एक टक्का आसने १८ ते २१ वयोगटातील युवा मुंबईकरांसाठी लॉटरीद्वारे मोफत
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world