MNS Shivsena UBT Menifesto: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीचा ठाकरे बंधुंचा वचननामा आज प्रसिद्ध होत आहे. शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जाहीरनामा मांडला. या पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधुंनी मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. सोबतच सध्या सुरु असलेल्या बिनविरोध निवडणुकीवरुनही उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला.
मुंबईकरांसाठी ठाकरे बंधुंच्या मोठ्या घोषणा!
- घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये स्वाभिमान निधी
- 10 रुपयात जेवण आणि नाश्ता
- नोकरदार पालक तसेच कष्टकरी महिलांना सांभाळणारी पाळणाघरे
- पाळीव प्राण्यासाठी दवाखाना
- बाळासाहेब ठाकरे स्वयं रोजगार अर्थसाह्य योजना
- मुंबई पालिकेतील अत्यावश्यक रिक्त पद भरणार
- प्रत्येक वार्डात आजी आजोबा मैदान
- 700 चौ फुटापर्यत मालमत्ता कर माफ कचरा कर रद्द
- महापालिकेच्या शाळा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही
- दहावीनंतर महापालिका शाळेत बारावीपर्यत ज्युनियर कॉलेज
- मुंबई पब्लिक स्कुलचा दर्जा अत्याधुनिक करणार
- मराठी शाळेत बोलतो मराठी हा हसत खेळत मराठी शिकवणारा डिजिटल उपक्रम सुरु करणार
- मुंबई महानगर पालिकेतर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सर्वात मोठं ग्रंथालय
- मुंबई चं सुपर स्पेशालिस्ट कॅन्सर रुग्णालय
- रॅपिड बाईक मेडिकल असिस्टंट ऍम्ब्युलन्स सेवा
- उत्तम दर्जाचे रस्ते बनवले जातील कंत्राटदाराकडून रस्त्याची 15 वर्षाची हमी घेतली जाईल
- सांडपाणी प्रक्रिया करणारे मल निसारण प्रकल्प उभारणार
- पाण्याला दर स्थिर ठेवून मुंबईकरांना पाणी उपलब्ध करून देणार
- फुटपाथ आणि मोकळ्या जागा
- खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास
- महिला आणि विध्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास
- महापालिकेच्या पार्किंगमध्ये मोफत पार्किंग व्यवस्था
- प्रत्येक वार्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
- समुद्राचे पाणी गोड्या पाण्यात रूपांतर करून वापरण्यायोग्य करणार
- मुंबईतील नालेसफाई 12 महिने प्रक्रिया राबवणार
- मुंबईतील नागरिकांना 100 युनिटपर्यत वीज मोफत
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
"आज राज्यात जी काही सध्या झुंडशाही सुरु आहे असेच सध्या वातावरण आहे. मतचोरी पकडल्यानंतर आता उमेदवारांची पळवापळवी सुरु आहे. हा जनतेचा अपमान आहे. साम दाम दंड भेद करुन निवडणुका बिनविरोध केल्या जात आहेत. आपले जे विधानसभा अध्यक्ष आहेत, राहुल नार्वेकर ते आपल्या पदाचा दुरोपयोग करुन दमदाटी करत आहेत. निवडणूक आयोगाने हे गांभीर्याने घ्यायला पाहिजे. आणि त्यांचे अध्यक्षपद काढून घेतले पाहिजे," अशी मोठी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world