BMC Election 2026: महाराष्ट्राच्या राजकारणात महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. मुंबईमध्ये महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा हायहोल्टेज सामना पाहायला मिळत आहे. पालिका निवडणुकांचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात आला असून मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. एकीकडे कल्याणमध्ये पैसे वाटपावरुन शिवसेना शिंदे गट- भाजपमध्ये जुंपल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातही मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे.
ठाकरे- शिंदे गटात राडा
राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडालेला असतानाच मुंबईतील प्रभाग क्रमांक १२४ मध्ये मध्यरात्री शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सकीना शेख यांच्या कार्यकर्त्यांवर शिंदे गटाचे उमेदवार हारून खान यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे विक्रोळीच्या पार्क साईट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
Maharashtra Election LIVE: पुण्यात काँग्रेसची मोठी कारवाई; माजी महापौरांसह 20 जणांचे निलंबन
प्राथमिक माहितीनुसार, शिंदे गटाचे कार्यकर्ते परिसरात पैसे वाटप करत असल्याचा संशय ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना होता. यावरून दोन्ही गट आमनेसामने आले आणि शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले. ठाकरे गटाचा असा दावा आहे की, पैसे वाटप पकडल्याच्या रागातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या राड्यामध्ये ठाकरे गटाचे दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
समर्थकांची जोरदार गर्दी
दरम्यान, घटनेनंतर दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी पार्क साईट पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती. ठाकरे गटाने याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल केली असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून प्रकरणाचा तपास करत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या राड्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
What is PADU: काय आहे 'पाडू'? मुंबई महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच होणार वापर