जाहिरात

BMC Election: लाखांवरुन कोटींकडे झेप.. तेजस्वी घोसाळकरांकडे 'इतकी' संपत्ती; मुंबईतील श्रीमंत उमेदवार कोण?

BMC Election 2026 Top 5 Richest Candidate: सर्वात श्रीमंत महापालिकेच्या निवडणुकीच्या लढाईत बलाढ्य आणि धनाढ्य उमेदवार  उतरले आहेत. हे उमेदवार काही साधेसुधे नाहीत तर चांगले कोट्यधीश आहे.

BMC Election: लाखांवरुन कोटींकडे झेप.. तेजस्वी घोसाळकरांकडे 'इतकी' संपत्ती; मुंबईतील श्रीमंत उमेदवार कोण?

BMC Election 2026 Who is Richest Candidate: मुंबई महापालिका म्हणजे आशियातली सर्वात श्रीमंत महापालिका. महापालिकेच्या याच तिजोरीची चावी हातात पाहिजे म्हणून महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी सर्वस्व पणाला लावले आहे. 227 वॉर्डमध्ये तब्बल सतराशे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सर्वात श्रीमंत महापालिकेच्या निवडणुकीच्या लढाईत बलाढ्य आणि धनाढ्य उमेदवार  उतरले आहेत. हे उमेदवार काही साधेसुधे नाहीत तर चांगले कोट्यधीश आहे.

 मुंबईतल्या या माजी नगरसेवकांकडे गडगंज संपत्ती आहे. मात्र नवख्या उमेदवारांची संपत्ती पाहून तुमचेही डोळे पांढरे होतील. सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याचा मान शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकरांना मिळालाय. सरवणकरांची संपत्ती एक दोन कोटीने नाही तर तब्बल 37 कोटींनी वाढली आहे. माजी महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव तसंच विशाखा राऊतांचीही कोट्यवधींची मालमत्ता आहे.

Pune Richest Candidate: पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार! हा 'आमदार'पुत्र कोट्यवधींचा मालक; संपत्ती किती?

मुंबईच्या माजी महापौरांकडे संपत्ती किती? 

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या वॉर्डक्रमांक 199 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे एकूण मालमत्ता 5 कोटी 26 लाख इतकी आहे. २०१७ मध्ये त्यांची संपत्ती 1 कोटी 61 लाख इतकी होती. म्हणजेच त्यांच्या मालमत्तेत  3 कोटी 65 लाख इतकी वाढ झाली आहे. 

त्याचबरोबर ठाकरेंच्याच शिवसेनेच्या नेत्या, माजी महापौर श्रद्धा जाधव या वॉर्ड क्रमांक 202 मध्ये निवडणूक लढवत आहेत. त्यांची एकूण मालमत्ता तब्बल 46 कोटी इतकी आहे. 2024 मध्ये त्यांची 44 कोटी इतकी होती. त्यांच्या एकूण संपत्तीत 2 कोटींची वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ माजी महापौर विशाखा राऊत यांची मालमत्ता 7 कोटींनी वाढून 21 कोटी 83 लाखांवर पोहोचली आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आलेल्या उमेदवार म्हणजे तेजस्वी घोसाळकर. ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये गेलेल्या तेजस्विनी अभिषेक घोसाळकर या वॉर्ड क्रमांक 2 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे एकूण 5 कोटींची संपत्ती आहे. महत्त्वाचे म्हणजे 2017 मध्ये त्यांची संपत्ती फक्त 25 लाख इतकी होती. म्हणजेच 8 वर्षात त्यांची संपत्ती 4 कोटी 75 लाखांनी वाढली आहे. 

Gujarati Vs Gujarati : मुंबई पालिका निवडणुकीत 'गुजराती विरुद्ध गुजराती' लढती कुठे होणार ?

सदा सरवणकर ठरले सर्वात श्रीमंत उमेदवार

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.  2017 मध्ये समाधान सरवणकर यांची मालमत्ता 9 कोटी 43 लाख होती, ती आता थेट 46 कोटी 59 लाखांवर गेली आहे. म्हणजेच त्यांच्या संपत्तीत 37 कोटींहून अधिकची वाढ दिसून येत आहे. त्यापाठोपाठ भाजपचे नील किरीट सोमय्या यांची मालमत्ता 8 वर्षांत 1 कोटी 99 लाखांवरून 9 कोटींवर गेली आहे. तसेच, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले रवी राजा यांची संपत्ती 10 कोटी 12 लाख झाली असून, 8 वर्षांत त्यात 5 कोटींची वाढ झाली आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com