लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! योजनेत छाननी होणार का? अदिती तटकरे म्हणाल्या...

राज्य सरकारकडून या योजनेत बदल होणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी सर्वात महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचंड गाजली. लाडक्या बहिणींनी दिलेल्या भरभरुन मतांमुळेच महायुतीचे सरकार पुन्हा एकता सत्तेत आले आहे. अशातच आता निवडणुकांनंतर पुन्हा एकदा ही योजना चर्चेत आली आहे. राज्य सरकारकडून या योजनेत बदल होणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी सर्वात महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाल्या अदिती तटकरे?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये बदल करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. महिलांना त्यांचे पैसे मिळणार आहेत. अशी कोणतीही अट आम्ही घातलेली नाही. महिलांना त्यांचे पैसे मिळणारच आहेत. ही योजना राबवताना आम्ही अत्यंत योग्य पद्धतीने आणि विचार करुन राबवत आहोत. त्यामुळे जे पैसे आम्ही द्यायचे ठरवले आहेत ते देणारच, असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

नक्की वाचा - "नाना पटोलेंनी वाट मोकळी केली म्हणून... "देवेंद्र फडणवीसांनी पहिल्याच भाषणात मानले आभार

तसेच या योजनेबाबत एखाद्या लाभार्थी अर्जामध्ये तक्रार आल्यास त्याची छाननी करण्यात येईल. मी महिला व बालकल्याण मंत्री असल्यापासून तशी कोणतीही तक्रार आली नव्हती. आता तशी काही तक्रार आली असेल तर मला माहिती नाही. त्यामुळे तक्रारी असतील तर छाननी होईल. मात्र मोठ्याप्रमाणात छाननी होणार नाही, असंही अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेत महत्वाचे बदल होणार असल्याचे समोर आले होते. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्वाचे विधान केले होते. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे महिलांना 2100 रुपये मिळतील. मात्र त्याबाबतचा विचार राज्याच्या ्अर्थ संकल्पीय अधिवेशनादरम्यान केला जाईल, असं ते म्हणाले होते. 

Advertisement

"अमृताहूनि गोड तुझे नाम देवा", रोहित पाटलांचं भाषण ऐकून फडणवीसांनाही हसू आवरेना