भारत संचार निगमचे एक कार्यालय जळगावमध्ये आहे. कार्यालयातील महाव्यवस्थापक महेश कुमार हे मराठी भाषेचा द्वेष करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिवसेना शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हा आरोप केला आहे. त्यांनी कार्यालयात कर्मचाऱ्यांना मराठी न बोलता हिंदी व इंग्रजी बोलण्याचे फर्मान काढले आहे असा ही आरोप केला जात आहे. शिवाय त्यासाठी दबावही टाकला जातोय असा ही आरोप केला आहे. ही माहिती शिवसैनिक आणि मनसैनिकांना मिळता त्यांनी भारत संचारचे कार्यालय गाठवे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
जळगाव इथं असलेल्या भारत संचारच्या कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते धडकले. त्यावेळी तो अधिकारी तिथे होता. मराठी बोलू नका, हिंदी इंग्रजी बोला याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. शिवाय कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला चांगले धारेवर धरले. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. तर दुसरीकडे मात्र परप्रांतीय अधिकारी मराठी भाषेचा द्वेष करत असल्याचे समोर आले आहे.
ट्रेंडींग बातमी - निर्दयी बाप! दोन चिमुकल्या मुलींचा आधी खून केल मग नदीत फेकले
या घटनेनंतर मनसैनिकां बरोबर शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेचा सन्मान केला आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारचाच अधिकारी मराठाचा असा अपमान करत असेल तर ते सहन केले जाणार नाही असा दम यावेळी भरण्यात आला. यावरच हे मनसैनिक थांबले नाहीत. त्यांनी या अधिकाऱ्याला माफी मागायला भाग पाडले. शिवाय मराठी बोलण्याची सक्तीही या अधिकाऱ्यावर केली. त्यानंतरच त्याची सुटका झाली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world