जाहिरात

Buldhana News : केसगळतीनंतर बुलढाण्यात नवं संकट; नखं गळून पडत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट

बुलढाण्यातील केसगळतीची समस्या कमी होते न तोच गावकऱ्यांसमोर आरोग्यासंदर्भातील नवं संकट उभं राहिलं आहे.

Buldhana News : केसगळतीनंतर बुलढाण्यात नवं संकट; नखं गळून पडत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट

Buldhana hair loss Issue  : बुलढाण्यातील बाधित पट्ट्यातील शेतजमिनीमध्ये सेलेनियम धातूचं प्रमाण वाढल्यामुळे झिंकमध्ये घट झाल्याने तेथे केसगळती झाल्याचा निष्कर्ष संशोधनाअंती काढण्यात आला होता. बुलढाण्यातील अनेक गावातील नागरिकांचे केस अक्षरश: गळून हातात येत होते. केसगळतीची समस्या कमी होते न तोच गावकऱ्यांसमोर आरोग्यासंदर्भातील नवं संकट उभं राहिलं आहे. बुलढाण्यातील नागरिकाच्या समस्या अद्याप संपलेल्या नाहीत, असंच यावरुन समोर येत आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील केसगळती प्रकरणात आता आणखी वाढ झाली आहे. बोंडगावमध्ये केसगळती नंतर आता नागरिकांच्या बोटांची नखंही गळून पडत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शेगाव तालुक्यातील इतर गावांतील नागरिकांची बोटांच्या नखांचं आरोग्य बिघडत चालले आहे. अनेकांची नखं गळून पडत आहे. तर अनेकांची नखं मधूनच तुटली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

नक्की वाचा - Buldhana hair loss : बुलढाण्यात अचानकपणे केसगळती का सुरू झाली? संशोधनातून धक्कादायक खुलासा

दोन महिन्यानंतर अद्याप केस गळती संदर्भात आयसीएमआरचा अहवाल आलेला नाही. त्यातच आता नवी समस्या उद्भवल्यामुळे नागरिकाचे आरोग्य अडचणीत सापडले आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: