जाहिरात

Buldhana News: दारु विक्रेत्याचा माज! पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीला लाथ घालून पाडलं, जागीच मृत्यू

दारू विक्रेत्याने पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकी वाहनाला लाथ मारल्यामुळे  पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे.

Buldhana News: दारु विक्रेत्याचा माज! पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीला लाथ घालून पाडलं, जागीच मृत्यू

अमोल गावंडे,  बुलढाणा: पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकीवर अवैध दारु विक्रेत्याने  लाथ मारुन हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यामध्ये घडला आहे. या घटनेता एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून एक कर्मचारी जखमी झाला आहे. या भयंकर घटनेने जिल्हा पोलीस दलात खळबळ एकच खळबळ उडाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांची हिंमत चांगलीच वाढली असून एका दारू विक्रेत्याने पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकी वाहनाला लाथ मारल्यामुळे  पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ गावात ही घटना घडली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. भागवत गिरी असे मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून राम आंधळे जखमी झाले आहेत..

अंढेरा पोलीस स्टेशनचे राम आंधळे आणि भागवत गिरी दुचाकीने शेळगाव आटोळ परिसरात पेट्रोलिंग करत होते. शिवणकर नामक अवैध दारू विक्रेता दारूचे बॉक्स घेऊन शेळगाव आटोळकडे जात होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून शिवणकरला पकडण्याचा प्रयत्न केला.. मात्र शेळगाव आटोळ जवळ  शिवणकरने पोलिसांचा दुचाकीला लाथ मारली.

ट्रेंडिंग बातमी - RSS News: 'औरंगजेब भारताचा नायक होवू शकत नाही, खरा धोका...' RSS चे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे थेट बोलले

त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. यात दुचाकी चालवणारे भागवत गिरी यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी राम आंधळे याना उपचारासाठी दवाखान्यात भरती केले, दरम्यान पोलिस   अधीक्षकांनी जखमी पोलीस कर्मचाऱ्याची भेट घेतली असून मृतकाचे नातेवाईकांचा ही भेट घेतली. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबल उडाली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Sanjay Raut: '...त्यावेळी राणे कुटुंबीयांनीच उद्धव ठाकरेना फोन केले',संजय राऊतांनी सर्वच काढलं

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: