
अमोल गावंडे, बुलढाणा: नवे घर बांधण्यासाठी जुने माळवद पाडताना ते अंगावर पडल्याने बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातील शेलोडी येथे ही दुर्घटना घडली. शालिग्राम वाळूस्कर आणि योगेश वाळूस्कर असे मृत्यू झालेल्या बाप-लेकाचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातील शेलोडी येथे माळवद कोसळून बाप लेकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेलोडी येथील दामोदर घाडगे यांना जुने माळवद चे घर पाडून नवे घर बांधायचे होते. त्यासाठी त्यांनी माळवद पाडण्याचे काम त्यांनी गावातीलच शालिग्राम वाळूस्कर यांना दिले होते. आज सकाळी शालिग्राम वाळूस्कर त्यांचा मुलगा योगेश , राम घाडगे, सुनील नेमाने हे माळवाद पाडण्याचे काम करत होते.
त्यावेळी जीर्ण झाले माळवद जुन्या लाकडांसह मजुरांच्या अंगावर कोसळले. यात शालिग्राम वाळूस्कर (वय, 65) आणि त्याचा मुलगा योगेश वाळूस्कर(32) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच राम घाडगे आणि सुनील नेमाने हे दोघे जखमी झाली असून गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. जखमी असलेल्या दोघांवर चिखली येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
नक्की वाचा - Political News : "बरं झालं पक्ष फुटला…", सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल
अकोल्यात भीषण अपघात, पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू...
अकोल्याच्या मुर्तीजापुरच्या राष्ट्रीय महामार्गावर कुरुंमजवळ भीषण अपघात झाला. जळगाव येथील पराग लिमये आणि पत्नी अल्पना लिमये हे चार चाकीने प्रवास करीत असताना महामार्गावर दिशादर्शक फलक न लावता महामार्गावर झाडाला पाणी देण्यासाठी उभे असलेल्या टँकरला कारची जोरदार धडक बसली. या अपघातात पराग लिमये हे गंभीर जखमी झाले तर पत्नी अल्पना लिमये यांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला. तर टँकरवरील सुनील ठाकरे यांचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world