सुनील कांबळे, लातूर
दारुच्या नशेत किरकोळ वादानंतर कारने दिलेल्या धडकेत बाईकवरून जाणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघेजण जखमी आहे. मृतांमध्ये आई आणि मुलाचा समावेश आहे. तर वडील आणि मुलगी जखमी आहेत. लातूर-सोलापूर महामार्गावर ही घटना घडली आहे. औसा पोलिसांना याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चार अटक करण्यात आली असून एकजण फरार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर-सोलापूर महामार्गावरील बुधोडा ते पेठ या महामार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील दोघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कारचालक दारू पिऊन गाडी चालवत होता. त्या गाडीत पाच जण होते रस्त्यावरील जाणाऱ्या वाहनांना कट मारणे, शिवीगाळ करणे, आरडाओरडा करुन कार वेडीवाकडी चालवणे असे प्रकार सुरू होते.
(नक्की वाचा- 'तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकली', फेक कॉलने घेतला महिलेचा जीव)
कारने एका दुचाकाली देखील कट मारली. यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या सादिक शेख यांनी याबाबत कारचालकाला जाब विचारला. त्यावेळी कारमधील चार-पाच जणांसोबत त्यांची बाचाबाची झाली. वादानंतर सादिक आपल्या पत्नी आणि दोन चिमुकल्यासह त्या ठिकाणाहून लातूरकडे निघाले. दुचाकी पुढे गेल्यानंतर कारने पाठीमागून या कुटुंबाला उडवले.
(नक्की वाचा- शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा वारंवार पाठलाग, विनयभंग अन् पुढे...)
यामध्ये इकरा सादीक शेख, नादिया शेख हे जागीच ठार झाले. तर सादीक आणि मुलगा आहाद हा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून औसा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.तर चार जणांना अटक करण्यात आली आहे.