
अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात 4 भिक्षेकऱ्यांचा अचानक मृत्यू झाला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या नातेवाईकांनीही मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. या भिक्षेकऱ्यांना अन्न देण्यात आलं नव्हतं. त्यांना बांधून ठेवण्यात आलं होतं असा आरोप त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी केली होता. त्यामुळे नक्की या भिक्षेकऱ्यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. रुग्णालय प्रशासनावर संशय व्यक्त केला जात होता. पण आता त्यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याचा अहवाल आला आहेत. त्यात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्या चारही भिक्षेकऱ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्या अहवाला नुसार हृदयविकार, उच्च रक्तदाब यासोबतच अल्कोहोलिक विड्रॉल या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यू बाबत ज्या काही शंका उपस्थित केल्या गेल्या आहेत त्यावर पूर्ण विराम मिळाला आहे. या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाकडे बोट दाखवण्यात आले होते. मृतांच्या नातेवाईकांनीही गंभीर आरोप केले होते.
शिर्डी येथे नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करत 49 भिक्षेकर्यांना ताब्यात घेतलं होतं. त्या भिक्षेकर्यांना श्रीगोंदा तालुक्यातील सुधारगृहात ठेवण्यात आलं. मात्र एप्रिलच्या सहा तारखेला यातील सात भिक्षेकर्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होतं. त्यानंतर 8 तारखेला ही 3 भिक्षेकर्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
उपचारादरम्यान दाखल केलेल्या भिक्षेकर्यांपैकी चार भिक्षेकर्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शासकीय रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांनी मोठा गदारोळ केला होता. त्यांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर तीन सदस्यांची चौकशी समिती देखील नेमण्यात आली. त्यानंतर शवविच्छेदनाचा अहवाल देखील मागवण्यात आला. या अहवालात मृत्युमुखी पडलेल्या भिक्षेकर्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक एन एस चव्हाण यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world