जाहिरात

Chandrapur Crime: मालकाकडे दिवाळी गिफ्टचा हट्ट, वाद वाढला अन् रक्त सांडलं.. क्रुर हत्येने चंद्रपुरात खळबळ!

Chandrapur Latest News: दिवाळी असल्याने नितेशने मालकाकडून नवीन कपडे किंवा गिफ्टची अपेक्षा केली होती. मात्र, सुजितने गिफ्ट दिले नाही. याचा राग धरून नितेश त्याला फोनवरून शिवीगाळ करीत होता.

Chandrapur Crime: मालकाकडे दिवाळी गिफ्टचा हट्ट, वाद वाढला अन् रक्त सांडलं.. क्रुर हत्येने चंद्रपुरात खळबळ!

अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी:

चंद्रपूर: देशभरात दिवाळी आनंदात साजरी झाली, उत्साहात मोठ्या आनंदात सण साजरा झाला. मात्र चंद्रपूरमध्ये ऐन दिवाळीत रक्तरंजित घटना घडली. दिवाळीचा गिप्ट दिले नाही म्हणून सुरु झालेला वाद हत्येवर येऊन पोहचला. सहा जणांनी मिळून एका तरुणाची हत्या केली. नितेश ठाकरे (२७) असे मृतक तरुणाचे नाव आहे. करण मेश्राम (२२), यश छोटेलाल राऊत (१९) अनिल रामेश्वर बोंडे (२२), प्रतीक माणिक मेश्राम (२२), तौसीफ शेख (२३), सुजित गणवीर (२५) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.  (Chandrapur Crime News) 

नेमकं काय घडलं? 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गापूर येथे सुजित गणवीर याचे पानटपरीचे दुकान आहे. त्याच्याकडे मृतक नितेश ठाकरे हा काही महिन्यांपासून काम करत होता. दिवाळी असल्याने नितेशने मालकाकडून नवीन कपडे किंवा गिफ्टची अपेक्षा केली होती. मात्र, सुजितने गिफ्ट दिले नाही. याचा राग धरून नितेश त्याला फोनवरून शिवीगाळ करीत होता. या प्रकाराला सुजित वैतागला.त्याने नको ते करायचे ठरविले. आपल्या मित्रांना सोबत घेत नितेशचा शहरातील लॉ कॉलेज परिसरात हत्या केली.

Satara News: "माझ्यावर अन्याय होत आहे...", साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

केवळ हत्या करून तो थांबला नाही. घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचात्याने प्रयत्न केला.घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेच पथक घटनास्थळी पोहचले. तासाभरात त्यांनी आरोपीना अटक केली. अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक करीत आहे.

चित्रपट बघायला बोलाविले अन...

वाद टोकावर गेला होता. सुजितच्या मनात नितेशविरुद्ध कमालीचा राग होता. त्याने त्याची हत्या करण्याचे ठरविले.हत्येसाठी त्याने ऑनलाइन चाकू बोलाविला. नितेशला चित्रपट बघू असे सांगून त्याला बोलाविले.आपल्या मित्रांसह नितेशला बाहेर घेऊन गेला.शहरातील लॉ कॉलेजच्या मागील हुकूम परिसरात निर्जनस्थळी घेऊन आरोपींनी नितेशला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला.

(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com