जाहिरात

Mumbai News : मुंबईकरांवरील विघ्न संपेना! कोसळलेलं झाड पाहायला गेलेल्यांवरच 'संक्रांत'; 9 जणं रुग्णालयात भरती

मुंबईत दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाबरोबरच मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागत आहे.

Mumbai News : मुंबईकरांवरील विघ्न संपेना! कोसळलेलं झाड पाहायला गेलेल्यांवरच 'संक्रांत'; 9 जणं रुग्णालयात भरती
प्रतिकात्मक फोटो

Mumbai News : मुंबईत दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाबरोबरच मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटनांनंतर पालिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यावरील झाड शाळेच्या बसवर कोसळल्यामुळे एका ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आज गुरुवारी एक ५५ वर्षीय व्यक्ती मॅनहोलमध्ये पडल्याने त्याचाही जीव गेला. दरम्यान आज झाडांची पाहणी करण्यासाठी गेलेले कर्मचारी आणि तेथे उपस्थित असलेल्या काहींच्या अंगावरच झाड कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत ८ जण जखमी झाले आहेत. यामध्ये काही स्थानिकांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईतील सांताक्रुझमधून ही घटना समोर आली आहे.

झाडांची पाहणी करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांवरच कोसळलं झाड...

मुंबईत झाड अंगावर कोसळल्याने आठ जण जखमी झाले आहेत. सांताक्रूझमध्ये रहेजा कॉलेजशेजारी असलेल्या एका खासगी इमारतीच्या आवारात एक झाड कोसळलं होतं. त्या कोसळलेल्या झाडाची पाहणी करण्यासाठी हे सर्व जण आणि कर्मचारी तिथे गेले होते. मात्र बाजूचंच एक झाड या सर्वांच्या अंगावर कोसळलं. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय. मुंबईत आज दिवसभरात झाडं कोसळण्याच्या एकूण ९१ तक्रारी प्राप्त झाल्या. यात मुंबई शहरात १३ तर पूर्व उपनगरात २२ आणि पश्चिम उपनगरातल्या ५६ तक्रारींचा समावेश होता.

नक्की वाचा - 'तो आता खेळायला येईल...', मुंबईत झाड कोसळल्याने कुटुंबाचं जग उद्ध्वस्त, विहानची बॅट छातीला बिलगून आई निस्तब्ध!

या घटनेत जखमी झालेल्या ८ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

जखमींची नावं खालीलप्रमाणे...

१ नूर आलम - २६ वर्षे
२ राजेश कुडाळ - ५१
३ विनय कदम - ३८
४ सुलेमान शेख - २८ वर्षे
५ विनोद भट - ४६ वर्षे
६ देवर्षी सिंह - २८ वर्षे
७ जगदीश निकम - २८ वर्षे
८ निलाद तुळे - ६७ वर्षे


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com