राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने राज्यभरातील ओबीसी समाजातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तुळजापूर शहरात देखील ओबीसी समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत आंदोलन करण्यात आले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान ओबीसी समाजाने केवळ भुजबळ यांच्याकडे पाहूनच महायुतीला मतदान केलं आहे. त्यामुळे हा केवळ छगन भुजबळ यांचा अपमान नसून ओबीसी समाजाचा अपमान आहे. त्यामुळे आम्ही छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी सोडून वेगळा विचार करावा, अशी मागणी केल्याची माहिती ओबीसी नेत्या डॉ. स्नेहा सोनकाटे यांनी दिली.
(नक्की वाचा- "प्रश्न मंत्रिपदाचा नाही", छगन भुजबळांनी सांगितलं नाराजीचं खरं कारण)
"फडणवीसांना मी मंत्रिमंडळात हवा होतो"
मंत्रिपद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल. त्या त्या पक्षाचा जो प्रमुख आहेत, ते याबाबत निर्णय घेतात. भाजपचा निर्णय देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे आणि आमच्या पक्षाचा निर्णय अजित पवार घेतात. मात्र प्रश्न मंत्रिपदाचा नाही, ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे. त्या संदर्भात आणखी काही सांगेन. मला जे कळलं त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात मी असावं असा आग्रह धरला होता.
(नक्की वाचा- छगन भुजबळ समर्थक आक्रमक, अजित पवारांच्या फोटोला जोडे मारून नोंदवला निषेध)
नाशिकमध्ये भुजबळ फार्मच्या बैठकीत काय घडलं?
सूत्रांच्या माहितीनुसार, छगन भुजबळ वेगळा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहेत. मंत्रिपद देण्यास अजित पवार हेच मुख्य अडसर आहेत. देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा हा निर्णय मान्य नाही. जे येतील त्यांच्यासोबत जे नाही येणार त्यांना सोडून निर्णय घेणार. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भुजबळांची नाराजी व्यक्त केली. तीव्र स्वरूपाचे आंदोलन न करण्याचा भुजबळांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला.