जाहिरात

Chhagan Bhujbal : "प्रश्न मंत्रिपदाचा नाही", छगन भुजबळांनी सांगितलं नाराजीचं खरं कारण

मी आता विधानसभेचा राजीनामा देऊ शकत नाही. मला निवडून आणण्यासाठी माझ्या लोकांनी कष्ट केले. एक-दोन वर्ष मला द्या, असं मी म्हटलं होतं, असा संताप छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. 

Chhagan Bhujbal : "प्रश्न मंत्रिपदाचा नाही", छगन भुजबळांनी सांगितलं नाराजीचं खरं कारण

मंत्रिमंडळ वाटप झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा देखील मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासूनच छगन भुजबळांनी उघड आपली नाराजी व्यक्त केली. सोमवारी अधिवेशन सोडून छगन भुजबळ आपल्या मतदारसंघात पोहोचले. आपल्या समर्थकांशी बोलून पुढचा निर्णय घेणार असल्याचं भुजबळांना सांगितलं आहे. यावेळी मंत्रिपद मिळालं नाही याचं दु:ख नाही. ज्याप्रकारे अवहेलना सुरु आहे ते चुकीचं आहे, अशी खंत देखील भुजबळांनी व्यक्त केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

"फडणवीसांना मी मंत्रिमंडळात हवा होतो"

मला मंत्रिपद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल. त्या त्या पक्षाचा जो प्रमुख आहेत, ते याबाबत निर्णय घेत असतो. भाजपचा निर्णय देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे आणि आमच्या पक्षाचा निर्णय अजित पवार घेतात. मात्र प्रश्न मंत्रिपदाचा नाही, ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे.  मला जे कळलं त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात मी असावं असा आग्रह धरला होता. 

(नक्की वाचा-  सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे विधानसभेत पडसाद, विरोधकांच्या निशाण्यावर असलेला वाल्मिक कराड कोण?)

लोकसभा निवडणुकीतही मला निवडणूक लढण्यासाठी आग्रह करण्यात आला होता. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सांगितलं  आहे की नाशिकमध्ये छगन भुजबळच लोकसभेची निवडणूक लढतील, असं मला सांगण्यात आलं होतं. त्यानंतर एक महिना इथे आम्ही आलो आणि चांगलं वातावरण निर्माण झालं. मात्र महिनाभर आमचं नावच जाहीर केलं नाही. त्यानंतर मी माघार घेतली, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

राज्यसभेसाठी आधी डावललं

राज्यसभेची जागा आली त्यावेळी सुनेत्रा ताईंना पाठवलं. दुसरी जागा आली त्यावेळी मकरंद पाटील यांचे बंधू यांना राज्यसभेवर पाठवलं. कारण त्यांना शब्द दिलाय असं मला सांगितलं. तुम्ही महाराष्ट्रात असणे पक्षाची गरज आहे. तुम्ही इथे राज्यात लढायला पाहिजे. आणि आता सांगत आहे तुम्ही राज्यसभेवर जा. कारण आता मकरंद पाटील यांना मंत्रिपद दिले. त्यांच्या भावाला राजीनामा देण्यासाठी सांगणार आहेत.

(नक्की वाचा-  'AI चा वापर करुन आरोपींवर कारवाई करणार'; सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी CM फडणवीसांचं आश्वासन)

मी हातातले खेळणे नाही

मात्र मी आता विधानसभेचा राजीनामा देऊ शकत नाही. मला निवडून आणण्यासाठी माझ्या लोकांनी कष्ट केले. एक-दोन वर्ष मला द्या, असं मी म्हटलं होतं. यावर आपण चर्चा करु., असं मला सांगितलं. मात्र ते चर्चेला कधी बसलेच नाहीत. मी काही हातातले खेळणे नाही, असा संताप छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. 

नाशिकमध्ये भुजबळ फार्मच्या बैठकीत काय घडलं?

सूत्रांच्या माहितीनुसार, छगन भुजबळ वेगळा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहेत. मंत्रिपद देण्यास अजित पवार हेच मुख्य अडसर आहेत. देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा हा निर्णय मान्य नाही. जे येतील त्यांच्यासोबत जे नाही येणार त्यांना सोडून निर्णय घेणार.  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भुजबळांची नाराजी व्यक्त केली. तीव्र स्वरूपाचे आंदोलन न करण्याचा भुजबळांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: