छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar : उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स छत्रपती संभाजीनगर शहरात लागले आहेत.  त्यावर राजू शिंदे यांचा उल्लेख शिवसेना ठाकरे गटाचे नेते असा करण्यात आला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि महायुतीला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जिल्ह्यातील मोठे नेते, माजी उपमहापौर राजू शिंदे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. राजू शिंदे यांना थांबवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेल्या दोन दिवसांपासून भाजपकडून राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. एवढेच काय तर राजू शिंदे यांच्याबाबत भाजपकडून तब्बल आठ बैठका झाल्या, पण तरीही भाजपला राजू शिंदे यांचं मनपरिवर्तन करता आलं नाही.

(नक्की वाचा- Pune News : पुण्यातील ही ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित; पोलिसांनी जारी केली यादी)

राजू शिंदे यांनी फेसबूकवर पोस्ट लिहिली की, "आता माघार नाही..! आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये  प्रवेश करत आहोत. आपण जी मला साथ दिली यापुढेही देताल हीच इच्छा."

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स छत्रपती संभाजीनगर शहरात लागले आहेत.  त्यावर राजू शिंदे यांचा उल्लेख शिवसेना ठाकरे गटाचे नेते असा करण्यात आला आहे. राजू शिंदे यांच्या राजकीय भूमिकेचा आगामी विधानसभा निवडणुकांवर कसा परिणाम होईल हे येत्या काळात स्पष्ट होईल. 

Advertisement

(नक्की वाचा- 'अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत' सुनेत्रा पवारांची इच्छा काय?)

राजू शिंदे यांच्या  राजकीय भूमिकेमुळे भाजपचे अतुल सावे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना मोठा धक्का मानला जात आहे. मंत्री अतुल सावे यांच्या छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात राजू शिंदे वर्चस्व आहेत. त्यांनी नगरसेवकपदाची सुरुवात येथूनच केली असल्याची त्यांचा येथे मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे अतुल सावे यांना याचा फटका बसू शकतो. 

तर दुसरीकडे गेल्या विधानसभा निवडणुकीत राजू शिंदे यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत संजय शिरसाट यांना राजू शिंदे आव्हान देऊ शकतात. राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्याने महायुतीच्या दोन आमदारांना एकाचवेळी फटका बसू शकतो. त्यामुळे राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचा भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला.

Advertisement
Topics mentioned in this article