
Chhatrapati Sambhajinagar News : स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. अनेकजण स्वप्नाच्या घरासाठी वर्षानुवर्षे पैसे जमा करतात. घरातलं सोनंही विकतात. बँकेकडून चक्रवाढ व्याजाने लोन घेतात. घरासाठी 15 ते 20 वर्षे याचं लोन फेडण्याची त्यांची तयारी असते. इतका खटाटोप करून स्वप्नांचं घर उभं केल्याच्या पाच वर्षात तेच घर कोसळत असल्याचं दिसलं तर काय अवस्था होईल?
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या पाच वर्षात इमारतीच्या कॉलम कोसळल्याचं समोर आलं आहे. तब्बल 16 फ्लॅट असलेल्या बिल्डिंगला अक्षरशः जॅक लावण्यात आलं आहे. अवघ्या पाच वर्षांत इमारतीची भीषण अवस्था कशी झाली असा सवाल उपस्थित केला जात आहे. पैठण तालुक्यातील फारोळा येथील प्रकार यामुळे इमारतीतील 70 पेक्षा अधिक रहिवासी चक्क मंदिरात रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे या बिल्डरकडून आपली फसवणूक झाल्याची भावना येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
नक्की वाचा - Palghar Shocking Video : मालकिणीचा मुजोरपणा, आंदोलनादरम्यान कामगारांच्या अंगावर घातली गाडी
अनेकांनी या घरासाठी गृहकर्ज घेतलं आहे. 20 वर्षांचे बँक हप्ते अजून फेडण्याचे बाकी असतानाच पाच वर्षात बिल्डिंग कोसळण्याच्या मार्गावर आल्याने रहिवाशांचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडून अधिकाऱ्यांना लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world