छ. संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांच्या समर्थकांच्या गाडीमध्ये पैसे असल्याचा संशय, नागरिकांनी अडवली गाडी

संभाजीनगरच्या सोयगावमध्ये शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तारांच्या समर्थकांची गाडी अडवण्यात आली.

जाहिरात
Read Time: 2 mins
सिल्लोड:

मोसिन शेख, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड मतदारसंघातील सोयगाव येथे गाडीमध्ये पैसे असल्याच्या संशयाने नागरिकांनी महायुतीच्या उमेदवाराची गाडी अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर निवडणूक अधिकारी आणि नागरिकांमध्ये वादावादी झाली होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी गाडीची झडती घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

नक्की वाचा - Wai Assembly Election : वाईत चुरशीची लढत; मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी बॅकफुटवर 

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरच्या सोयगावमध्ये शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तारांच्या समर्थकांची गाडी अडवण्यात आली. गाडीमध्ये पैसे असल्याच्या संशयाने नागरिकांनी त्यांची गाडी अडवली. या गाडीतून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यानंतर निवडणूक अधिकारी आणि नागरिकांमध्ये वादावादी झाली. अधिकाऱ्यांनी गाडीची योग्य प्रकारे झडती घेतली नसल्याचा आरोप नागरिकांशी केला आहे. 

वरळी कोळावाडा परिसरात भांडी वाटप?
दुसरीकडे वरळी कोळीवाडा परिसरातही असाच प्रकार समोर आला आहे. वरळी कोळीवाडा परिसरात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याकडून घरोघरी भांडी वाटप करीत असल्याचं काही व्हिडिओमधून दिसून येत आहे. या  पदाधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आचारसंहितेचा भंग केला असतानाही   पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सिल्लोड मतदारसंघातून शिवसेना महायुतीकडून अब्दुल सत्तार, महाविकास आघाडीकडून सुरेश बनकर यांच्यात थेट लढत आहे. काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार सिल्लोड मतदारसंघातील सोयगावमधून कितीच्या लीडने निवडून होतील यावर दोन कार्यकर्त्यांमध्ये पैज लागल्याचं वृत्तही समोर आलं होतं. 

Advertisement