Chhatrapati Sambhajinagar Crime : एक मोमोजची डिश पडली 20 लाखाला; तरुणासोबत भयंकर घडलं!

पीडित तरुण हैदराबादच्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत अकाउंटंट आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

छत्रपती संभाजीनगरमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. भूक लागल्याने मोमोज खायला थांबलेल्या या तरुणाला ही मोमोजची डिश वीस लाखांना पडली आहे. हा तरुण मोमोज खाण्यासाठी कारमधून उतरला मात्र कार लॉक करणे विसरल्याची चूक मेघा इंजिनिअरिंगच्या अकाऊंटटला चांगलीच महागात पडली आहे. मोमोज खाण्याच्या नादात केलेल्या एका चुकीमुळे तरुणाचे तब्बल वीस लाख रुपये लंपास झाल्याचं समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati Sambhajinagar Crime) हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

छत्रपती संभाजीनगरात मोमोज खाणं चांगलंच महागात पडलं आहे. हा तरुण कारमधून जात होता. भूक लागली म्हणून मोमोज खायला थांबला. अवघ्या  15 मिनिटात कारमधील 20 लाख लंपास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

नक्की वाचा - Crime News: अर्नाळा किल्ल्याजवळ पती-पत्नीचा मृतदेह सापडला, हत्या की आत्महत्या?

मोमोसमुळे तब्बल 20 लाखांचा फटका

पीडित तरुण हैदराबादच्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत अकाउंटंट आहेत. हा तरुण कंपनीची पैशांची बॅग घेऊन कारने चालला होता. दरम्यान भूक लागली म्हणून हा तरुण कारमधून खाली उतरला. पैशांची बॅग कारमध्ये होती. मात्र हा कार लॉक करायवा विसरला, याचा फायदा घेत चोरट्यांनी त्याच्या कारमधून पैशांनी भरलेली बॅग लांबवली आहे. हा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको कॉर्नर येथील डी- मार्टसमोर घडला. वऱ्हालबाबू सत्यम कुरपुरोल यांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधा सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

Topics mentioned in this article