Lizard In Food: सरकारी हॉस्टेलच्या जेवणात सापडली पाल, 28 विद्यार्थ्यांना उलट्या मळमळ; प्रकृती खालावली

Lizard Found In Food: छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉस्टेलच्या जेवणात पाल आढळल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Lizard Found In Food: सरकारी हॉस्टेलच्या जेवणात आढळली पाल"

Lizard Found In Food: छत्रपती संभाजीनगरमधील एका सरकारी हॉस्टेलच्या जेवणात पाल आढळल्याने खळबळ उडालीय. या घटनेनंतर तब्बल 28 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचीही माहिती समोर आलीय. जेवणामध्ये पाल सापडल्यानंतर विद्यार्थ्यांनी तीव्र निषेध नोंदवला, यानंतर प्रशासनाने प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिलं.

निष्काळजीपणास जबाबदार कोण?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या सरकारी हॉस्टेल क्रमांक 1च्या मेसमधील हा निष्काळजीपणा उघडकीस आला. विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या गवारीच्या भाजीमध्ये मेलेली पाल आढळली. मेलेली पाल असलेली भाजी विद्यार्थ्यांच्या ताटात वाढण्यात आली. जेवणानंतर विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळण्याचा त्रास होऊ लागला. तातडीने तब्बल 28 विद्यार्थ्यांना तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

(नक्की वाचा: Kurla News: मुंबई हादरली! केक कापला, आधी दगड-अंडी मग पेट्रोल ओतलं... 5 जणांनी मित्रांला जिवंत पेटवलं अन्...)

विद्यार्थ्यांनी नोंदवला निषेध

मेसच्या निष्काळजीपणाविरोधात विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमध्ये निदर्शने सुरू केली. गोंधळ निर्माण झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मेस कंत्राटदारावर चौकशी तसेच तत्काळ कारवाईचे आश्वासन दिले.  

(नक्की वाचा: Delhi News: धक्कादायक! बड्या उद्योगपतीच्या सूनेने गळफास घेऊन संपवलं जीवन, दोन लग्नांची चर्चा; एक पत्नी अभिनेत्री?)

दरम्यान या हॉस्टेलमध्ये निवासी सुविधा उपलब्ध आहेत. राज्य सरकारच्या कल्याण विभागाद्वारे हे हॉस्टेल चालवले जाते. उच्च शिक्षण तसेच अन्य शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षणाकरिता घरापासून दूर राहणाऱ्या दुर्गम ग्रामीण भागातील किंवा आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि मोफत निवास व्यवस्था प्रदान करणे हे या हॉस्टेलचे प्राथमिक उद्देश आहे.  

Advertisement