जाहिरात

Kurla News: मुंबई हादरली! केक कापला, आधी दगड-अंडी मग पेट्रोल ओतलं... 5 जणांनी मित्रांला जिवंत पेटवलं अन्...

Mumbai News: पाच जणांनी मित्राच्याच वाढदिवशी इतका वाईट प्रकार केलाय की ऐकून मन सुन्न होईल. या घटनेमुळे मुंबई हादरलीय.

Kurla News: मुंबई हादरली! केक कापला, आधी दगड-अंडी मग पेट्रोल ओतलं... 5 जणांनी मित्रांला जिवंत पेटवलं अन्...
"Mumbai News: मुंबई हादरली"
Canva

Mumbai News: वाढदिवसाच्याच दिवशी पाच जणांनी मित्राला जिवंत पेटवल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडलीय. मित्रांनी पीडित तरुणाला केक कापण्यासाठी घराबाहेर बोलवले. वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली त्याच्यावर सुरुवातीस अंडी फेकली, मग दगडांनी मारले. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर त्याच्यावर पेट्रोल ओतून लायटरने पेटवलं. पीडित व्यक्तीला जिवंत जळताना पाहून पाचही जणांनी घटनास्थळावरुन पळ काढला. मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये ही हादरवणारी घटना घडलीय, व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

नेमके काय आहे प्रकरण?

21 वर्षीय अबुल रहमान मकसूद आलम खान असे पीडित तरुणाचं नाव आहे. FIRमधील माहितीनुसार, पीडित तरुण खालसा कॉलेजमध्ये BAF विषयाच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. 25 नोव्हेंबर रोजी त्याचा वाढदिवस होता. यानिमित्ताने मित्रांनी घराबाहेर सोसायटी परिसरात त्याला अबुलला बोलवले. 24 नोव्हेंबर रोजी रात्री जवळपास 8 वाजेदरम्यान आरोपी अयाज मलिकने अबुलला फोन केला आणि रात्री 12 वाजता केक कापायचं आहे, असे सांगितलं. त्यानुसार शारीफ नावाच्या मित्राने अबुलला फोन करून कोहिनूर फेज 3 सोसायटीच्या विंग क्रमांक 26 जवळ येण्यास सांगितलं.अबुल पोहोचण्यापूर्वी तेथे अयाज मलिक, अशरफ मलिक, कासिम चौधरी, हुजैफा खान आणि शारीफ शेख केक घेऊन हजर होते.  

केक कापल्यानंतर मारहाण आणि हल्ला 

पीडित तरुणाने नोंदवलेल्या जबाबानुसार जसे केक कापायला सुरुवात केली तसे सर्व मित्रांनी दगड फेकण्यास आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने पाचही जणांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याचं म्हणणं कोणीही ऐकून घेतलं. यादरम्यान अयाज मलिक त्याच्या स्कुटीवर ठेवलेली बाटली घेऊन आला, त्यामध्ये पेट्रोल होते. आधी अयाज आणि त्यानंतर अशरफ मालिकाने बाटलीतील पेट्रोल पीडित तरुणाच्या अंगावर ओतले. पेट्रोलचा वास आल्यानंतर अबुलने 'अरे हे काय करताय' अशी विचारणा केली. तेव्हा उर्वरित तीन आरोपी कासिम, हुजैफा आणि शारीफने त्याला पकडले आणि 'ओता ओता' असे ते ओरडत राहिले.

Gauri Garje Suicide Case: गौरी गर्जेंच्या मृत्यूच्या 5 तासांपूर्वी नेमकं काय घडलं, FIRमधील 5 मुद्दे गूढ उलगडणार?

(नक्की वाचा: Gauri Garje Suicide Case: गौरी गर्जेंच्या मृत्यूच्या 5 तासांपूर्वी नेमकं काय घडलं, FIRमधील 5 मुद्दे गूढ उलगडणार?)

धक्कादायक! लायटरने पेटवलं...

पीडित तरुणाने पुढे सांगितलं की, जसं मी पळायला लागलो तसे अयाज मलिकने लायटरने त्याला पेटवलं. काही सेकंदात त्याचे कपडे आणि शरीर जळू लागलं. जीवाच्या आकांताने तो ओरडत होता. पण कोणीही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, सर्वांनी घटनास्थळावरुन पळ काढला.  

Delhi News: धक्कादायक! बड्या उद्योगपतीच्या सूनेने गळफास घेऊन संपवलं जीवन, दोन लग्नांची चर्चा; एक पत्नी अभिनेत्री?

(नक्की वाचा: Delhi News: धक्कादायक! बड्या उद्योगपतीच्या सूनेने गळफास घेऊन संपवलं जीवन, दोन लग्नांची चर्चा; एक पत्नी अभिनेत्री?)

कसा वाचवला स्वतःचा जीव?

पीडित तरुण पळतपळत बिल्डिंग क्रमांक 27च्या वॉचमनपर्यंत पोहोचला, जेथे त्यानं पाण्याची बाटली स्वतःवर ओतली. पण आग विझली नाही, अखेर पुढे जाऊन पाण्याचं नळ उघडून अंगावर पाणी ओतले. अशा पद्धतीने त्यानं स्वतःचा जीव वाचवला. थोड्या वेळाने आरोपी हुजैफा पुन्हा तेथे आला आणि जखमी अवस्थेत अबुलला घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये गेला, जेथे त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या अबुलवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सर्व पाच आरोपींना अटक करून 29 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावलीय आणि तपास सुरू आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com