जाहिरात

Online Engagement: नवरदेव लंडनला, नवरी वैजापुरात.. VIDEO कॉलवर सोहळा; डिजिटल साखरपुड्याची जिल्ह्यात चर्चा!

Chhatrapati Sambhajinagar Engagement On VIDEO Call: साखरपुडा लंडनमध्ये (London) एका प्रतिष्ठित कंपनीत कार्यरत असलेल्या आशुतोष पुंड (Ashutosh Pund) या तरुणाशी व्हिडिओ कॉलद्वारे पार पडला. 

Online Engagement: नवरदेव लंडनला, नवरी वैजापुरात.. VIDEO कॉलवर सोहळा; डिजिटल साखरपुड्याची जिल्ह्यात चर्चा!

Chhatrapati Sambhajinagar Online Engagement Ceremony: आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान काय करेल, याचा नेम नाही! याचे उत्तम उदाहरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ असलेल्या फुलेवाडी या गावात पाहायला मिळाले. परदेशात नोकरी करणाऱ्या तरुणाचा साखरपुडा व्हिडिओ कॉलद्वारे पार पडला आहे. वेळ आणि अंतराचे बंधन झुगारून, दोन्ही कुटुंबांनी स्वीकारलेला हा आधुनिक निर्णय सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. (Engagement On VIDEO Call) 

ऑनलाईन साखरपुड्याची चर्चा

ऑनलाईन मिटींग, ऑनलाईन परीक्षा होतात, असं तुम्ही ऐकलं असेल. पण ऑनलाईन साखरपुडाही होऊ शकतो बरं का? तंत्रज्ञानाचा आविष्कार आता खेडोपाड्यातही पोहोचला असून असाच एक ऑनलाईन साखरपुडा सोहळा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला आहे. वैजापूर ग्रामीण १ येथील प्रगती गायकवाड (Pragati Gaikwad) या तरुणीचा साखरपुडा लंडनमध्ये (London) एका प्रतिष्ठित कंपनीत कार्यरत असलेल्या आशुतोष पुंड (Ashutosh Pund) या तरुणाशी व्हिडिओ कॉलद्वारे पार पडला. 

Latest and Breaking News on NDTV

नवरदेव आशुतोष सध्या लंडनमध्ये नोकरी करत असल्यामुळे, साखरपुड्यासाठी त्याला लगेच सुट्टी घेऊन येणे शक्य नव्हते. आशुतोष आठ दिवसांच्या सुट्टीसाठी भारतात आला असतानाच मुलीला बघण्याचा कार्यक्रम झाला होता आणि मुलगी आवडल्यानंतर साखरपुडा करण्याचे ठरले. मात्र, पुन्हा सुट्टी न मिळाल्याने कुटुंबीयांनी ऑनलाईन साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला.

लंडनमध्ये नवरदेव, वैजापूरमध्ये नवरी... 

या अनोख्या साखरपुड्यासाठी मुलीच्या घरी, वैजापूर येथे, पारंपरिक विधी (Traditional Rituals) करण्यात आले. तर नवरदेवाने लंडनहून थेट व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाइन उपस्थिती (Online Presence) लावली आणि 'होकार' दिला. साखरपुड्यासाठी मोठा मंडप टाकण्यात आला होता, पाहुण्यांची गर्दी जमली होती. नातेवाईकांच्या उपस्थितीत हा ऑनलाईन साखरपुडा मोठ्या जल्लोषात पार पडला. 

या वेळी समारंभात उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी टाळ्यांच्या गजरात (Clapping) नवदांपत्याला शुभेच्छांचा वर्षाव केला. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून करण्यात आलेला हा साखरपुडा केवळ फुलेवाडीतच नव्हे, तर संपूर्ण वैजापूर परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com