Amravati Election: चिखलदऱ्यात काँग्रेसचा भाजपला धक्का, शेख अब्दुल शेख हैदर यांची नगराध्यक्ष म्हणून निवड

Amravati Political News: चिखलदऱ्याची ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली होती.

जाहिरात
Read Time: 1 min

शुभम बायस्कार, अमरावती

Chikhaldara Nagar Parshad Result: अमरावतीच्या चिखलदरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शेख अब्दुल शेख हैदर यांनी 461 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे विद्यमान नगराध्यक्ष राजेंद्र सोमवंशी यांचा पराभव केला असून, या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

याच नगरपालिकेत मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे भाजपचे पारडे जड मानले जात होते. मात्र, मतदारांनी नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या बाजूने कौल दिल्याने भाजपच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

अमरावती जिल्ह्यात एकूण 12 ठिकाणी निवडणुका पार पडल्या. चिखलदरा आणि दर्यापूर वगळता अनेक ठिकाणी भाजपने आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे.

(नक्की वाचा-   Dhule Nagarparishad Election: पिंपळनेरमध्ये शिंदेंच्या आमदाराला धक्का, सत्तेच्या चाव्या आता भाजपकडे!)

अमरावती जिल्ह्याचा पक्षनिहाय निकाल (12 नगरपरिषद/पंचायती)

  • धारणी - भाजप
  • चिखलदरा- काँग्रेस
  • अचलपूर- भाजप
  • चांदुरबाजार- भाजप
  • मोर्शी - शिवसेना (शिंदे गट)
  • शेंदूरजना घाट- भाजप
  • वरुड - भाजप
  • दर्यापूर- काँग्रेस
  • अंजनगाव सुर्जी- भाजप
  • धामनगाव रेल्वे- भाजप
  • नांदगाव खंडेश्वर- शिवसेना (ठाकरे गट)

Topics mentioned in this article