मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आज ते त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जातील. त्यानंतर नाशिकमध्ये बैठक घेतली. दुसरीकडे कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा सर्वात मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार असून केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने याची अधिसूचना काढली आहे. कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक नाराज होते. अशातच त्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.
कुणाल कामराचा शो ज्या हॉटेलमध्ये झाला त्या ठिकाणी शिवसैनिकांची तोडफोड
खारच्या युनीकाॅन्टीनेंटल हाॅटेलमध्ये शिवसेना आक्रमक झाली. या ठिकाणी शिवसैनीकांनी तोडफोड करून आपला निषेध नोंदवला आहे. याच हॉटेलमध्ये कुणाल कामरा याचा शो झाला होता. त्यावेळी त्याने एकनाथ शिंदे यांचे विडंबन केले होते. शिवाय त्यांच्यावर टीका करणारी एक विडंबनात्मक कवीता ही सादर केली होती.
छत्रपती संभाजीनगर शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय हद्दीत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. शहर हद्दीत निदर्शने, धरणे, मोर्चा, मिरवणुक काढण्यास मनाई आदेश लागू आहेत.
माजी क्रिकेटपटू आणि पंचांसाठी मासिक पेन्शन रकमेत 50 % वाढ
माजी क्रिकेटपटू आणि पंचांसाठी मासिक पेन्शन रकमेत ५०% वाढ करण्यात येईल, ज्यामुळे खेळासाठी आपले करिअर समर्पित करणाऱ्यांसाठी अधिक आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित होईल. असं मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केलं आहे. असोसिएशनच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
LIVE Updates: स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी सुरु
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी सुरु
शिवसेना मुंबई उपनगर संवाद बैठकीच वांद्रे पूर्व येथे आयोजन
मुंबई उपनगर संपर्कप्रमुख मंत्री उदय सामंत घेणार शिवसेनेच्या नेत्यांची आणि विभाग प्रमुखांची बैठक
पक्ष बांधणी, पक्ष विस्तार आणि पक्षकार्य या विषयांवर आजच्या संवाद बैठकीचा आयोजन...
LIVE Updates: अशोक चव्हाण यांचे मेव्हणे माजी खासदार भास्करराव पाटील यांचा राष्ट्ववादीत प्रवेश
माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचे मेव्हणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपास्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नरसी येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. सून मीनल पाटील खतगावकर यांचा नायगाव विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. मीनल खतगावकर काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या होत्या. पण काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीत दगाफटका केल्याने पराभव झाल्याची सल खातागावकर यांच्या मनात होती.
Akola News: अकोल्यात जातीय सलोखा कायम राहावा, सर्व धर्मीय व विविध सामाजिक संघटना एकवटल्या
राज्यात नागपूरच्या घटनेनंतर अशांततेचे वातावरण झाले असताना.. दुसरीकडे अकोल्यात जातीय सलोखा कायम राहावा यासाठी सर्व धर्माचे धर्मगुरू आणि सामाजिक संघटना एकवटल्या आहेत.. दरम्यान अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहात या सर्व धर्मीयांचे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली दरम्यान या बैठकीत अकोल्यात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी, असा निर्धार केलाये.. अकोला जिल्ह्यात कुठल्याही आक्षेपार्ह पोस्ट किंवा विधाने करू नये. ही खबरदारी घेण्याचं आवाहन ही यावेळी करण्यात आलंय..
Raigad news: बर्निंग कारचा थरार! भररस्त्यात पेट घेतला
श्रीवर्धन येथून म्हसळ्याचा दिशेने येणारी हुंडाई कंपनीची असेंट गाडी वडघर पांगळोली भागात आली असता त्या गाडीला अचानक आग लागल्याची घटना आज घडली.
अचानक धूर निघायला लागल्यावर वाहनचालक अब्रार राऊत याने प्रसंगावधान दाखवत वाहन थांबवले आणि इतर सहप्रवाश्याना बाहेर येण्यास सांगितले.
सर्व बाहेर निघताच वाहनाने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीमुळे गाडी जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Thane News: मुरबाडमध्ये गोठ्याला भीषण आग 22 बकऱ्यांचा मृत्यू, तर 6 म्हशी, 6बैल होरपळले
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात शेतकऱ्याच्या गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत २२
बकऱ्यांचा मृत्यू झालाय. तर ६ बैल आणि ६ म्हशी आगीत होरपळून गंभीर जखमी झालेत. कोरावळे गावातील पुंडलिक धुमाळ या शेतकऱ्याच्या गोठ्याला ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाकडून जखमी पशुंवर उपचार सुरू करण्यात आलेत. तर महसुल विभागाकडून पंचनामा करण्यात आला असून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
LIVE Updates: नागपुरातील संचारबंदी पूर्णतः हटवली
आज दुपारी 3 पासून नागपुरातील संचारबंदी पूर्णतः उठविण्यात आली आहे.
तहसील, कोतवाली, गणेशपेठ, यशोधरा या चार ही पोलिस ठाण्यांतर्गत क्षेत्रात संचार बंदी पूर्णतः उठविण्यात आल्याचे निर्देश पोलिसांनी जारी केले आहे.
पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांनी ही निर्देश जारी केले आहे.
Live Update : इंदापुरात महिलेकडूनच महिला सराफ व्यावसायिकेची फसवणूक, तब्बल 2 लाख ४० हजार रुपयांना गंडा
इंदापूर येथील सराफ व्यवसाय करणाऱ्या महिलेला शहरातीलच एका महिलेने बनावट दागिने सोन्याचे असल्याचे भासवून तब्बल दोन लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात सविता विजय शिंदे या 40 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Live Update : बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन अखेर मागे
दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी रायगडच्या पायथ्याशी सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज मागे घेतलं. मंत्री भरत गोगावले यांनी त्यांना शिरा आणि लिंबूपाणी देऊन आंदोलन मागे घेतल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल त्यांच्याशी फोन वरून चर्चा केली आणि या प्रश्नांवर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याचे आश्वासन दिल.
आज मंत्री भरत गोगावले आणि योगेश कदम यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी रोजगार हमी योजनेतून दिव्यांगाना रोजगाराची संधी मिळवून देण्याचं आश्वासन भरत गोगावले यांनी दिलं. त्यानंतर कडू यांनी आंदोलन थांबवत असल्याचं जाहीर केलं. 22 तारखेपासून बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू होतं.
Live Update : ओव्हरहेड वायर तुटल्याने विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्याही विलंबाने
ओव्हरहेड वायर तुटल्याने विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्याही विलंबाने
अनेक गाड्या चार ते पाच तास उशीरा
कोकणकन्या पाच तास उशीराने, तुतारी एक्सप्रेस एक तास, वंदे भारत एक्सप्रेस अर्धा तास, तेजस एक्सप्रेस अर्धा तास तर केरळ संपर्क क्रांति एक्सप्रेस अर्धा तास उशीराने धावत आहे.
तर रत्नागिरीहून मुंबईला जाणारी रत्नागिरी दिवा गाडी एक तास, मंगला एक्सप्रेस सव्वा तास उशिरा, नेत्रावती एक्सप्रेस सुद्धा सव्वा तास उशीराने धावत आह.
काल राजापूर जवळच्या आडवली इथं ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक झाली होती विस्कळीत
कालच्या प्रकाराने 11 गाड्या रेल्वे गाड्या धावत होत्या विलंबाने
आज देखील जवळपास नऊ गाड्या विलंबाने
होळीहुन परतीच्या प्रवासाला निघालेल्या प्रवाशांमधून नाराजीचे सूर
Live Update : पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या साखर कारखान्याला भीषण आग
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या साखर कारखान्याला भीषण आग
पाटण तालुक्यातील दौलतनगर- मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास रात्री भीषण आग
अडीच ते तीन तास आग धगधगत होती
आग विझावण्यासाठी मरळी सहकारी साखर कारखाना, कृष्णा हॉस्पिटल, जयवंत शुगर यासह कराड नगरपालिका अग्निशामक गाडी
आग पाहण्यासाठी रात्री लोकांनी केली होती मोठी गर्दी
Live Update : भगव्या रंगाचं सोवळं नेसून देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला
भगवे सोवळं परिधान करत मुख्यमंत्री त्र्यंबकेश्वर मंदिरात..
बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्यपीठ त्र्यंबकेश्वराचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं दर्शन
Live Update : रमजान निमित्ताने मिरजमध्ये पार पडली इफ्तार पार्टी, हिंदू-मुस्लीम युवा मंचाकडून आयोजन
सांगलीच्या मिरजेमध्ये रोजा निमित्ताने इफ्तार पार्टी पार पडली.हिंदू-मुस्लिम युवा मंच आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्यावतीने या इफ्तार पार्टीचा आयोजन करण्यात आलं होतं. मुस्लिम धर्मीयांमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यातील उपवास निमित्ताने मुस्लिम बांधवांच्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं.या प्रसंगी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, आमदार इद्रिस नायकवडी,जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह शासकीय अधिकारी व हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एकमेकांना खजूर भरवून यावेळी मुस्लिम बांधवांनी आपला उपवास सोडला. समाजामध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं.
Live Update : 12 तासात मेडिकल मेडिकल फोडणारा चोर अटकेत
अकोल्यातल्या मूर्तिजापुरात काश्मिरा मेडिकल शॉपमध्ये शटर तोडून चोरी झाली होती. हा संपूर्ण प्रकार झाला होता.. चोरी करणाऱ्या चोरट्यास 12 तासांत पोलिसांनी जेरबंद केलं होतंय.. त्याच्याकडून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.. मेडिकल शॉपचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी 12 हजार रुपये, चेक बुक व एक मोबाइल असा मुद्देमाल चोरी करतांना संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता. याप्रकरणी केवळ 12 तासांत चोरट्याला अटक केली असून सतिश कोलते असं या चोरट्याचं नाव आहे..
Live Update : अमळनेर तालुक्यातील मारवड येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातल्या मारवड येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील 39 संघ हे सहभागी झाले आहेत. या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच याप्रसंगी अनिल पाटील यांनी मैदानात उतरत खेळाडूंसोबत कबड्डी खेळण्याचा आनंद लुटला.