
समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अबु आझमी आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर विधानसभा आणि विधानपरिषदेत चर्चा झाली. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी विधानं करणारे प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनाही विरोधकांनी घेरलं. अधिवेशनादरम्यान या दोघांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानपरिषदेत अंबादास दानवेंनी कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावरील कारवाईच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. कोरटकरचा मोबाइल पोलिसात दाखल होतो, मात्र कोरटकर याला अटक का केली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यादरम्यान संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी थेट पंडित जवाहरलाल नेहरुंचा उल्लेख करीत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.
नक्की वाचा - Abu Azmi : सपाचे आमदार अबु आझमी निलंबित, औरंगजेबाबद्दल नेमकं काय म्हणाले होते?
कोरटकर आणि सोलापूरकरवरुन वाद सुरू असताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरटकरवर कारवाई होणारच आहे. सध्या कोरटकरने कोल्हापूरच्या कोर्टातून स्थगिती घेतली आहे. मात्र तुम्ही ठराविक ठिकाणी विरोध करता. त्यावेळी जितेंद्र आव्हाडांचा निषेध का करण्यात आला नाही? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. यापूर्वी जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते...औरंगजेब बलाढ्य होते आणि शिवाजी महाराज पाच फूटाचे.. हे रेकॉर्डवर आहे. तुम्ही याचा निषेध का केला नाही. फडणवीस पुढे म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलंय त्याचा निषेध करणार का? हिम्मत आहे तुमच्यात? आम्ही शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही. देश धरम पर मिटने वाला। शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परम प्रतापी। एक ही शंभू राजा था..असं म्हणत त्यांनी विरोधकांना निरुत्तरीत केलं. पंडित नेहरू यांचादेखील धिक्कार झाला पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणत होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world