जाहिरात

मुंबईहून 'या' ठिकाणी निघालेल्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी! विमानात होते 176 प्रवासी, पुढे काय घडलं?

Bomb Threat To  Air India Express Flight : उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबईहून वाराणसीकडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुंबईहून 'या' ठिकाणी निघालेल्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी! विमानात होते 176 प्रवासी, पुढे काय घडलं?
Bomb Threat To Mumbai Varanasi Flight
मुंबई:

Bomb Threat To  Air India Express Flight : उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबईहून वाराणसीकडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे वाराणसी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आली आहे. विमानात बॉम्बची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. विमानाची आपत्कालीन लँडिंग झाल्यानंतर तपासाची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. ई-मेलद्वारे विमान उडवण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. बॉम्ब निष्क्रिय पथक विमानतळावर तपास करत आहे. विमानातील सर्व 176 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबईहून वाराणसीकडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात बॉम्बची धमकी असल्याची माहिती मिळाली, तेव्हा वाराणसी विमानतळावर बुधवारी सकाळी मोठा गोंधळ उडाला, जेव्हा धमकीचा ई-मेल वाराणसी एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला प्राप्त झाला, त्यानंतर विमानाची तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. प्रवाशांना बाहेर काढून तपास सुरू करण्यात आला. एअर इंडिया एक्सप्रेसची ही फ्लाइट बुधवारी सकाळी मुंबईहून वाराणसीकडे रवाना झाली होती.

नक्की वाचा >> कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कार्यालयात केळवणची जंगी पार्टी, अधिकाऱ्यांना कोणी पकडलं? पाहा व्हायरल Video

वाराणसी एटीसीली आला धमकीचा ई-मेल

जेव्हा विमान वाराणसीच्या हवाई क्षेत्रात प्रवेशले, तेव्हा वाराणसी एटीसीला एक धमकीचा ई-मेल मिळाला. ई-मेलमध्ये लिहिले होते की विमानात बॉम्ब आहे आणि ते उडवले जाईल. एटीसीने तात्काळ विमानातील पायलटांना अलर्ट केले आणि आपत्कालीन स्थिती जाहीर केली. विमानतळ अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. कोणत्याही प्रवाशाला दुखापत किंवा नुकसान झाल्याची माहिती नाही. बॉम्ब निष्क्रिय पथकाने विमानाची सखोल तपासणी सुरू केली आहे.

नक्की वाचा >> Delhi Blast: 'या' अभिनेत्रीने दिल्ली स्फोटात गमावली सर्वात जवळची मैत्रिण, म्हणाली, "मागच्या आठवड्यातच तिने.."

कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही

अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू सापडल्याची पुष्टी झालेली नाही, मात्र तपास सुरू आहे. धमकीची माहिती मिळताच विमानतळ परिसरात ATS, STF, IB, LIU, विमानतळ पोलीस आणि CISF यांच्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या. विमानतळावरील टर्मिनल-1 आणि एप्रन क्षेत्र रिकामे करण्यात आले आणि प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की धमकीला गांभीर्याने घेत सर्व सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे. विमानाची संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच त्याला पुन्हा ऑपरेशनसाठी परवानगी दिली जाईल. प्राथमिक तपासात हे समोर आले आहे की धमकी ई-मेलद्वारे दिली गेली होती. याच ई-मेलमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद विमानतळांवरही हल्ल्याची चेतावणी देण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील प्रमुख विमानतळांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. एटीएस आणि सायबर सेलची टीम हा ई-मेल कुठून आणि कोणी पाठवला हे शोधण्याच्या कामात गुंतली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com