जाहिरात

राज्याला हुडहुडी, उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा; 'या' जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद

पुढील दोन दिवस मुंबईच्या किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

राज्याला हुडहुडी, उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा; 'या' जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद
मुंबई:

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून अहिल्यानगरचे तापमान 10 अंशाच्या खाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील निचांकी 9.4अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे मुंबईसह राज्यातील अनेक शहरांचा पारा दिवसागणिक खाली येत आहे. बुधवारी मुंबईचे किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले आहे. पुढील दोन दिवस मुंबईच्या किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

नक्की वाचा -  Weather Update : मुंबईचा पारा घसरला, शहरात 16 अंश किमान तापमानाची नोंद

बुधवारी अहमदनगरमध्ये राज्यातील सर्वात कमी 9.4 तर पुण्यात 9.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसात नाशिक, नगर, पुण्यात थंडीची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या कोकणातल्या दापोलीमध्ये थंडीची लाट उसळली असून कमाल व किमान तापमानात सतत चढ-उतार जाणवत आहे. दापोलीचा पारा 10.5 अंशापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या दापोलीमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडत आहे.

11 वाजेपर्यंत बोचरी थंडी जाणवते. नागरिकांनी या थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेतला आहे. तर काही लोकांनी उबदार कपडे बाहेर काढले आहेत. गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक दापोली येणं पसंत करत आहेत, तर दुसरीकडे नागरिकांनी व्यायामावरही भर दिला आहे. धुळे जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात दिवसागणिक थंडीचा कडाका वाढू लागला आहे. यंदाच्या हंगामातील धुळ्यात किमान तापमान पहिल्यांदाच 9 अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे. तर नाशिकमध्ये देखील तापमानाचा पारा घसरला आहे.

Winter Skin Care Tips : कोरड्या त्वचेमुळे आहात त्रस्त? या सोप्या 3 उपायांमुळे चेहऱ्यावर येईल तेज

नक्की वाचा - Winter Skin Care Tips : कोरड्या त्वचेमुळे आहात त्रस्त? या सोप्या 3 उपायांमुळे चेहऱ्यावर येईल तेज

अहिल्यानगर - 9.4
नाशिक - 10.6
परभणी - 11.6
जळगाव - 11.7
नागपूर - 11.7
महाबळेश्वर - 11.8
गोंदिया - 11.9
सातारा - 12
छ. संभाजीनगर - 12.2
नंदुरबार - 12.8
मालेगाव - 12.8
वर्धा - 13.5
बुलढाणा - 13.6
अकोला - 13.6
अमरावती - 14.1
सांगली - 14.4
सोलापूर - 15.2
कोल्हापूर - 15.5
अलिबाग - 15.8
मुंबई - 17.6
रत्नागिरी - 20.5
पालघर - 22.4

मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली, नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन..
राज्यात थंडीचा पारा वाढत असला तरी मुंबईत हवेची गुणवत्ता चिंताजनक असल्याचं दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील हवेची वाईच श्रेणीत नोंद झाली होती. तर काही भागातील हवा नियमित वाईट श्रेणीत नोंदली जात आहे. परिणामी मुंबईतील नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com