चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातलं एक प्रसिद्ध हिलस्टेशन आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडी पूर्णपणे गायब झाली होती. मात्र आता राज्यभरात थंडीची लाट पसरली आहे. उत्तरेकडील राज्यात वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे चांगलाच गारवा पसरलाय. त्यामुळे ठिकठिकाणी शकोट्या पेटवताना तसेच उबदार कपडे, स्वेटर घालून नागरिक घराबाहेर पडताना दिसतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान असणाऱ्यात विदर्भातही चांगलीच थंडी पडली आहे. विदर्भात जवळपास जिल्ह्यातील तापमान 15 अंशाच्या खाली गेले आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा पर्यटनस्थळाचा पारा 8 अंश सेल्सिअसपर्यंत कोसळला आहे . या ठिकाणी 7 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर पूर्णतः गारठला आहे.
(नक्की वाचा: अहिल्यानगर शहर बसेसची दयनीय अवस्थेवर, "महापालिका ठेकेदारांना पोसण्याच काम करते", नितीन भुतारेंचा आरोप)
आठवड्याभरानंतर थंडीने विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यात पुन्हा कमबॅक केले आहे. तापमान पाच ते सहा अंशांनी घटले आहे. तर अमरावती जिल्हा सरासरी 10 अंश तापमानाची नोंद झाली तर 14 तारखेपर्यंत अशीच थंडी कायम असणार आहे. फेंगल चक्रीवादळामुळे कडाक्याची थंडी पडत असताना अचानक थंडीमुळे गारठलेला परिसर सामान्य तापमानावर आला होता. मात्र आता पुन्हा कडाक्याची थंडी पडू लागली आहे.
दोन दिवसात तापमान घटणार
राज्यात येत्या दोन दिवसात किमान तापमानात कमालीची घसरण होणार असल्याचे हवामान विभागांने सांगितलं आहे त्यामुळे उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात दोन ते चार अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याची शक्यता आहे . तर इतर ठिकाणीही हळूहळू तापमान घसरणार असल्याचं हवामान विभागाने वर्तवले आहे.
(नक्की वाचा: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! योजनेचे निकष बदलणार का? अदिती तटकरेंकडून पत्रक जारी)
दिवसरात्र गरम कपडे व शेकोटीजवळ बसून थंडीपासून मेळघाटातील आदिवासी बांधवांना स्वतःची संरक्षण करावे लागत असल्याचे चित्र आहे. अमरावती शहरात पहाटे ज्येष्ठ नागरिक कडाक्याच्या थंडीतही व्यायाम करताना दिसून आले, तर ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world