जाहिरात

अरे वाह! आता रडायचं नाय,फक्त हसायचं, महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या ओंकार भोजनेची पुन्हा होणार ग्रँड एन्ट्री

Onkar Bhojane In Maharashtrachi Hasyajatra :  संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा विनोदी कलाकार ओंकार भोजने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर पुन्हा परतला आहे. ओंकारने त्याच्या आवडत्या शो मध्ये पुनरागमन केल्यानं चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

अरे वाह! आता रडायचं नाय,फक्त हसायचं, महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या ओंकार भोजनेची पुन्हा होणार ग्रँड एन्ट्री
Maharashtrachi Hasyajatra
मुंबई:

Onkar Bhojane In Maharashtrachi Hasyajatra :  संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा विनोदी कलाकार ओंकार भोजने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर पुन्हा परतला आहे. ओंकारने त्याच्या आवडत्या शो मध्ये पुनरागमन केल्यानं चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. सोनी मराठीच्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'या लोकप्रिय कार्यक्रमातून ओंकार हा घराघरात पोहोचला.'अगं अगं आई..'म्हणणारा ओंक्या हे पात्र असो वा 'हा इथे काय करतोय' विचारणाऱ्या मामाची भूमिका असो..ओंकारने विनोदी डायलॉग्जच्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. परंतु, ओंकारने मधल्या काळात या शो मधून ब्रेक घेतला होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजीचा सूर पसरवला होता. 

ओंकार भोजनेचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तगड्या फॅन फॉलोईंगमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मध्ये त्यांना पुन्हा एकदा एन्ट्री करावी, अशी मागणीही त्याच्या चाहत्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून केली होती. आता प्रेक्षकांनी दिलेली साद ऐकून ओंकार पुन्हा एकदा महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मध्ये झळकणार आहे. 

नक्की वाचा >> Ind vs WI : कोणालाच जमलं नाही..जडेजानं करून दाखवलं! दिल्लीच्या मैदानात मोडला कपिल देव यांचा सर्वात मोठा विक्रम

ओंकारनेस आता पुन्हा हास्यजत्रेच्या शूटिंगला सुरवात केली आहे.अशातच सोनी मराठी वाहिनीने नवा प्रोमो देखील सादर केला आहे. ओंकारने या मामाचं खास पात्र साकारल्याचं या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. ओंकारच्या घरवापसीमुळे प्रेक्षकांमध्ये हा शो पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'हास्यजत्रा हे माझे प्रेम आहे',असं ओंकार नेहमीच म्हणतो.या शो मध्ये ओंकारचं पुन्हा एकदा आगमन झाल्याने आता खऱ्याखुऱ्या विनोदाची म्हणजेच लाईव्ह कॉमेडीची सुद्धा झलक चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.  

ऐन दिवाळीत प्रेक्षकांना मनोरंजनाचा दुप्पट बोनस मिळणार हे नक्की.नम्रता संभेराव,समीर चौगुले,नम्रता संभेराव आणि वनिता खरात यांच्यासोबत ओंकारची जुगलबंदी पाहणे, ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते.त्यामुळे प्रेक्षकांची लाडकी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'आता ओंकार भोजनेच्या दमदार एन्ट्रीने आणखी रंगतदार होणार आहे.सज्ज व्हा, कारण आता हसून हसून पोट दुखायला लावणाऱ्या या 'कोकण कोहिनूर'ची धमाल पुन्हा सुरू झाली आहे.महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर आता पुन्हा'अगं अगं आई..असा आवाज घुमणार आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते बुधवार रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रदर्शीत केलं जातं. 

नक्की वाचा >> KBC च्या हॉटसीटवर घडतंय तरी काय? अमिताभ बच्चन यांच्यासमोरच लिटल विराटनेही केली मोठी चूक, गमावले 1 कोटी रुपये!

Listen to the latest songs, only on JioSaavn.com