जाहिरात

Maharashtrachi Hasyajatra: महेश मांजरेकरांची महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर दणक्यात एण्ट्री, प्रेक्षकांसाठी खास मेजवानी

Maharashtrachi Hasyajatra: महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर उपस्थिती दर्शवणार आहेत.

Maharashtrachi Hasyajatra: महेश मांजरेकरांची महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर दणक्यात एण्ट्री, प्रेक्षकांसाठी खास मेजवानी
Maharashtrachi Hasyajatra: महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत महेश मांजरेकरांची खास उपस्थिती

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतच आहे. नवनवीन गोष्टी आपल्याला या सीजनमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. त्यातील एक सरप्राइस येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी नुकतीच महाराष्ट्राची हास्यजत्राच्या (Maharashtrachi Hasyajatra) मंचावर उपस्थिती लावली. फक्त हजेरीच नाही लावली तर महेश मांजरेकर यांनी हास्यजत्राचे मंच देखील गाजवला. चक्क महेश मांजरेकर महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या मंचावर नाटुकले सादर करताना दिसणार आहेत. देवमाणूस (Devmanus Marathi Movie) या सिनेमाच्या प्रमोशनसाठी महेश मांजरेकर आणि संपूर्ण टीमने महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर हजेरी लावणार आहेत तसेच हास्यजत्रेचा आनंद घेणार आहेत.

(नक्की वाचा: Rajeshwari Kharat: या फोटोनंतर 'फँड्री'फेम शालूचे आणखी एक मोठे सत्य समोर)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Maharashtrachi Hasyajatra

(नक्की वाचा: Rinku Rajguru: रिंकू राजगुरुच्या आयुष्यातील 'पर्मनंट'व्यक्ती कोण? डिनर डेट,फोटो आणि चर्चांना उधाण)

विशेष म्हणजे महेश मांजरेकर या विशेष भागात एक संपूर्ण प्रहसन करणार आहेत. हास्यमहारथी समीर चौघुले, अभिनेत्री चेतना भट, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, अभिनेता रोहित माने आणि मंदार मांडवकर या कलाकारांसोबत ते आपल्याला दिसणार आहेत. शूटिंग-शूटिंग असे या प्रहसनाचे नाव असून धमाकेदार असे प्रहसन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी देखील महेश मांजरेकर हास्यजत्रेतील प्रहसनाचा भाग झाले होते. या प्रहसनामध्ये महेश मांजरेकर हास्यविरांसोबत मंचावर चक्क क्रिकेट खेळताना आपल्याला दिसणार आहेत. आता ते आपल्याला या विशेष भागात पाहायला मिळेल महेश मांजरेकर हास्यविरांची विकेट घेतात कि हास्यवीर महेश मांजरेकरांनी. हे पाहण्यासाठी आपल्याला हा महाराष्ट्राची हास्यजत्रा चा हा विशेष भाग पाहायला लागेल.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com