जाहिरात

वाघ-बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 25 लाखांची मदत मिळणार

शेतशिवारात अनेकदा बिबट्याचे दर्शन घडत आहे. यापूर्वी नागरिकांच्या तक्रारीनंतर वनविभागाकडून पिंजरे लावून बिबटे जेरबंद करण्याचे प्रयत्नही झाले आहेत.

वाघ-बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 25 लाखांची मदत मिळणार
भंडारा:

वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात जर कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना 25 लाखाची मदत या पुढे दिली जाणार आहे. तर जखमींना 5 लाखाची मदत दिली जाईल. याबाबतचा सरकारने निर्णय घेतला आहे. भंडारा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात वाघ आणि बिबटसह अन्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 302 जण जखमी झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून शहरी भागातील लोकवस्तीपासून ते ग्रामीण भागातील वाडी-वस्त्यांपर्यंत वाघ व बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यात जिल्ह्यात अनेक नागरिक जखमी झाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दिवसेंदिवस वाघ व बिबट्यांचे तसेच अन्य वन्यजीवांचे हल्ले वाढत चालले आहे. याची दखल सरकारने घेतली आहे. त्यामुळेच  या हल्ल्यातील गंभीर जखमींना 5 लाखांची मदत, तर मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय अशा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पावलंही उचलली जाणार आहेत. नागरिकांना वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळाले यासाठी वन विभागही प्रयत्न करत आहे.  

ट्रेंडिंग बातमी - 'EVM मध्ये घोटाळा, त्यामुळे महायुतीचा विजय' युतीतल्या माजी नेत्याचा खळबळजनक दावा

शेतशिवारात अनेकदा बिबट्याचे दर्शन घडत आहे. यापूर्वी नागरिकांच्या तक्रारीनंतर वनविभागाकडून पिंजरे लावून बिबटे जेरबंद करण्याचे प्रयत्नही झाले आहेत. दरम्यान, यापूर्वी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दिली जाणारी आर्थिक मदत ही तोकडी होती. जर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जर कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना 20 लाखाची मदत दिली जात होती. तर गंभीर जखमी झालेल्याला 1 लाख 25 हजार मदतीची तरतूद होती.  

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री शपथविधीची तारीख, ठिकाण, मुहूर्त ठरला? विलंबाचं कारणही आले समोर

ही रक्कम अधिक तोकडी होती. त्यात वाढ केली जावी अशी मागणी होत होती. सतत होणाऱ्या या मागणी मुळे शासनानेही निर्णय घेतला आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यात मृताच्या कुटुंबीयांना 25 लाखाची मदत मिळणार आहे. त्याला 5 लाखाची वाढ करण्यात आली आहे. तर जखमींच्या मदतीतही मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्या वन्य प्राण्यांकडून नागरिकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ही मदत राज्यातील अन्य जिल्ह्यांनाही लागू होणार आहे.