जयंत पाटलांविरोधात काँग्रेस आक्रमक; आचारसंहिता भंगाची कारवाई करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय असणारी इमारत ही काँग्रेसच्या मालकीची जागा असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रचार कार्यालय सुरू करताना संबंधित जागा मालकाची परवानगी घेणे आवश्यक आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

शरद सातपुते, सांगली

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसमधील कार्यालयाचा वाद आता पुन्हा उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या विरोधात सांगलीमध्ये काँग्रेसकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहेत.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या मालकी हक्कावरून काँग्रेसकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय असणारी इमारत ही काँग्रेसच्या मालकीची जागा असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रचार कार्यालय सुरू करताना संबंधित जागा मालकाची परवानगी घेणे आवश्यक आहे. 

(नक्की वाचा  - 'देवेंद्र तात्यांनीच मला सर्व शिकवलं' जरांगेंनी पुन्हा फडणवीसांना डिवचलं)

मात्र कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग आहे, असा आरोप वाळवा तालुका काँग्रेस अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केला आहे. याबाबत जयंत पाटलांच्या विरोधात आचार संहिताभंगची कारवाई करावी, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.  

(नक्की वाचा - काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश)

राज्यात महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असून देखील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी कार्यालयाच्या ताब्यावरून जयंत पाटलांच्या विरोधात भूमिका घेतल्याने विधानसभा निवडणुकीत स्थानिक काँग्रेस जयंत पाटलांच्या विरोधात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.