विशाल पुजारी, कोल्हापूर:
Kolhapur Mahanagarpalika Election 2026: राजकीय वर्तुळात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असून सतेज यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने कोल्हापूर महानगरपालिकेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीमध्ये 48 उमेदवारांची नावे आहेत.
काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर
समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय काँग्रेसने कोल्हापूर महानगरपालिकेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत 48 नावे घोषित करण्यात आलेत. शिवसेना ठाकरे गटाच्या जागा वगळून ही यादी जाहीर केलीये. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीत खासदार शाहू छत्रपती, विधान परिषदेचे गटनेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे इतर नेते यांच्या मार्गदर्शनाखाली ही नावे जाहीर करण्यात आलेत. 81 पैकी 48 जागा जाहीर केल्यानंतर उर्वरित जागापैकी शिवसेनेला कोणत्या जागा दिल्या जातील आणि काँग्रेस आणखी किती जागा घेणारं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
कोणाकोणाला मिळाली संधी?
प्रभाग क्र. २: आरती दिपक शेळके
प्रभाग क्र. ३ प्रकाश शंकरराव पाटील
किरण स्वप्निल तहसीलदार
प्रभाग क्र. ४
स्वाती सचिन कांबळे
विशाल शिवाजी चव्हाण
दिपाली राजेश घाटगे
राजेश भरत लाटकर
अर्जुन आनंद माने
प्रभाग क्र. ६
रजनिकांत जयसिंह सरनाईक
तनिष्का धनंजय सावंत
प्रतापसिंह दत्तात्रय जाधव
प्रभाग क्र. ७
उमा शिवानंद बनछोडे
प्रभाग क्र. ८
अक्षता अविनाश पाटील
ऋग्वेदा राहुल माने
प्रशांत उर्फ भैय्या महादेव खेडकर
इंद्रजित पंडितराव बोंद्रे
प्रभाग क्र. ९
पल्लवी सोमनाथ बोळाईकर
विद्या सुनिल देसाई
राहुल शिवाजीराव माने
प्रभाग क्र. १०
दिपा दिलीपराव मगदूम
प्रभाग क्र. ११
जयश्री सचिन चव्हाण
रियाज अहमद सुभेदार
प्रभाग क्र. १२
स्वालिया साहिल बागवान
अनुराधा अभिमन्यू मुळीक
ईश्वर शांतीलाल परमार
प्रभाग क्र. १३
पूजा भुपाल शेटे
प्रविण हरिदास सोनवणे
प्रभाग क्र. १४
दिलशाद अब्दुलसत्तार मुल्ला
अमर प्रणव समर्थ
प्रभाग क्र. १५
विनायक विलासराव फाळके
आश्विनी अनिल कदम
प्रभाग क्र. १६
संजय वसंतराव मोहिते
उमेश देवाप्पा पोवार
प्रभाग क्र. १७
उत्तम उर्फ भैय्या वसंतराव शेटके
अर्चना संदीप बिरांजे
शुभांगी शशिकांत पाटील
प्रभाग क्र. १८
प्रविण लक्ष्मणराव केसरकर
अरुणा विशाल गवळी
भुपाल महिपती शेटे
सर्जेराव शामराव साळुंखे
प्रभाग क्र. १९
दुर्वास परशुराम कदम
सुषमा संतोष जरग
( नक्की वाचा : Dombivli News : कल्याण-डोंबिवलीतील 27 गावांत निवडणुकीची रणधुमाळी थांबणार? उमेदवारांना थेट इशारा )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world