जाहिरात

Maharashtra Politics: 19 डिसेंबरला राजकीय भूकंप, मराठी माणूस पंतप्रधान? पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत

अमेरिकेतल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवली आहे.

Maharashtra Politics: 19 डिसेंबरला राजकीय भूकंप, मराठी माणूस पंतप्रधान? पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत

सुरज कसबे, पिंपरी- चिंचवड

Pune News: येत्या 19 डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, भारताचा पंतप्रधान बदलेल अन मराठी माणूस पंतप्रधान होईल, ती व्यक्ती भाजपचीच असू शकते, असं भाकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. पृथ्वीराज चव्हाणांनी हा दावा करताना जगात घडणाऱ्या घडामोडींचे संदर्भ दिलेत. अमेरिकेतील नव्या कायद्याचा ही दाखला चव्हाणांनी दिला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

समोर आलेल्या माहितीनुसार, "अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलेत, आता लवकरचं तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्यामुळं अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार आहे. अमेरिका सरकार एक कायदा करुन येत्या 19 डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे," अमेरिकेतल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवली आहे.

CM On Raj Thackeray: बेपत्ता मुलींचं पुढे काय होतं? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं धक्कादायक आकडेवारीचं सत्य

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "जेफ्री इस्फ्टीन अमेरिकेत इस्राएल चा गुप्तहेर होता.  त्याने  मोठे मोठे उद्योगपती, राजकारणी लोक, सेलिब्रिटी यांना हनी ट्रॅपमध्ये  अडकवले. अमेरिकेत याची फार मोठी गंभीर दखल घेतली गेली. अमेरिकेने 19 नोव्हेंबर रोजी एक कायदा केला, याबाबत 19 डिसेंबरला हे सर्व  प्रकाशित होणार आहेत. यामध्ये अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती बिल क्विंटन, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प , इजरायल चे पंतप्रधान , इंग्लंड चे राजपुत्र यांचं देखील नाव आले आहे त्यांनी सुद्धा हे कबूल केलं आहे."

तसेच "याबाबत जवळ जवळ 20 जीबी डेटा असून तो सर्वच्या सर्व प्रकाशित होणार आहे. ज्या मुलीचा छळ झाला त्यांना न्याय मिळावा म्हणून हा डाटा प्रकाशित होणार आहे. अमेरिकेच्या सोशल मीडियावर बरंच काही चाललं आहे त्याचा भारतीय राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो. आमचा तर पंतप्रधान होऊ शकत नाही आमच्याकडे तसे संख्याबळ नाही, कदाचित भारतीय जनता पक्षातील दुसरा कोणी मराठी माणूस बनू शकतो," असं पृथ्वीराज चव्हाण यांना म्हणालेत.

(नक्की वाचा-  VIDEO: नवले पुलावर वसंत मोरे थोडक्यात बचावले! फेसबुक लाईव्ह दरम्यानचा व्हिडीओ आला समोर)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com