जाहिरात

Political News : कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; सतेज पाटलांचे खंदे समर्थक शिवसेनेच्या वाटेवर?

Kolhapur News : काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचे खंदे समर्थक समजले जाणारे शारंगधर देशमुख हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. 

Political News : कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; सतेज पाटलांचे खंदे समर्थक शिवसेनेच्या वाटेवर?

विशाल पुजारी, कोल्हापूर

Kolhapur Political News : विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर आमदार सतेज पाटील यांना सगळ्यात मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर खंदे कार्यकर्ते साथ सोडत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सतेज पाटील यांच्यासोबत शिंदे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत इतरही काही स्थानिक नेते, कार्यकर्ते काँग्रेसला रामराम ठोकणार आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे काही माजी नगरसेवक भाजप आणि शिंदे गटांमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यामध्ये काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचे खंदे समर्थक समजले जाणारे शारंगधर देशमुख हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. 

विधानसभा निवडणुकीपासूनच देशमुख हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. देशमुख हे लवकरच शिवसेना शिंदे गटात  प्रवेश करणार असल्याची सूत्राद्वारे माहिती मिळाली आहे. देशमुख यांच्यासह काँग्रेसचे काही स्थानिक नेते आणि कार्यकर्ते  देखील काँग्रेसला रामराम ठोकणार आहेत. 

(नक्की वाचा: Political news: 'वादा पूर्ण करायचा नव्हता तर केलाच कशाला', सरकार विरोधात जानकर मैदानात)

काँग्रेसमधील नाराज कार्यकर्त्यांच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची बैठक नुकतीच पार पडली. आमदार सतेज पाटील देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला काँग्रेसच्या 34 माजी नगरसेवकांनी हजेरी लावत आपण काँग्रेस सोबतच राहणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांना स्पष्ट केले आहे. या बैठकीत शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर संजय मोहिते, राहुल माने, भूपाल शेटे, प्रवीण केसरकर, तौफिक मुल्लाणी, मधुकर रामाणे, सागर यवलुजे, श्रावण फडतारे, सुभाष बुचडे, शोभा कवाळे, ईश्वर परमार, राजाराम गायकवाड यांसारखे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले. मात्र महानगरपालिकेतील काँग्रेसचे नेते माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली. या बैठकीला पाठ फिरवल्यामुळे शारंगधर देशमुख हे काँग्रेसला सोडचिट्टी देणार यावर शिक्का मोर्तब करण्यात आला आहे.

(नक्की वाचा: Shivsena News: मुंबईत ठाकरे गटाला अजून एक धक्का, आता 'या' नेत्याने सोडली साथ)

काँग्रेसचे 12 नगरसेवक नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर आमदार सतीश पाटील यांनी ही बैठक बोलावली होती. ही बैठक सुरू झाल्यानंतर उपस्थित असणाऱ्यांमध्ये काही चर्चा देखील सुरू झाल्या. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी बैठकीस उपस्थित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांशी संवाद साधला. दरम्यान त्यांना मार्गदर्शन करत असताना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे दुःख सर्वांनाच आहे. मात्र खचून न जाता आणि आपल्याला सोडून जाणार्‍यांचा विचार न करता, जे येतील त्यांना सोबत घेऊन कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका पुन्हा जिंकण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com