जाहिरात

Shivsena News: मुंबईत ठाकरे गटाला अजून एक धक्का, आता 'या' नेत्याने सोडली साथ

आजी-माजी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि गटप्रमुखांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

Shivsena News: मुंबईत ठाकरे गटाला अजून एक धक्का, आता 'या' नेत्याने सोडली साथ
मुंबई:

मुंबई महानगरपालिका विधी समितीचे माजी अध्यक्ष आणि 2017 ते 2022 या कालावधीत उबाठा गटाचे नगरसेवक राहिलेले हर्षद प्रकाश कारकर यांनी पत्नी दिक्षा हर्षद कारकर यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना विभागप्रमुख स्वप्नील टेंम्बवलकर, शिवसेना महिली आघाडीच्या विभागप्रमुख मीना पानमंद हेदेखील उपस्थित होते. नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत शिवसेना शिंदे गट आणखी भक्कम झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आज पक्ष प्रवेश केलेल्या दिक्षा कारकर या युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्य असून सध्या महिला आघाडीच्या उपविभाग संघटक म्हणूनही त्या सक्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी, तसेच आजी-माजी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि गटप्रमुखांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. 

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकासाभिमुख राजकारणाला चालना मिळाली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये रस्ते, वाहतूक, जलसंपदा, आरोग्य, शिक्षण, तसेच औद्योगिक गुंतवणुकीसाठी राबवलेल्या योजनांमुळे राज्यात नवसंजीवनी मिळाली आहे त्यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. त्यांच्या कामामुळे लोकांचा शिवसेनेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. असं यावेळी हर्षद प्रकाश कारकर यांनी सांगितलं.  

ट्रेंडिंग बातमी - Operation sindoor: विश्व युद्धापासून भारत-पाक तणावापर्यंत, अनेकांचे प्राण वाचवणार्‍या सायरनचा इतिहास आहे खास

या पक्षप्रवेशामुळे मुंबईतील शिवसेना संघटनात्मक पातळीवर अधिक बळकट होईल आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास ही यावेळी कारकर यांनी व्यक्त केला. कारकर दाम्पत्याने ठाकरेंची सात सोडल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटातले अनेक माजी नगरसेवक हे शिंदे गटात प्रवेश करत आहेत.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com