लेखक आणि संपादक ज्ञानेश महाराव यांनी भाषणातून धार्मिक भावना दुखावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. कोल्हापुरात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संदीप निवृत्ती सासणे यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात फिर्यादी दिली होती. पोलिसांनी या फिर्यादीनंतर महारावावंवर गुन्हा दाखल केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमांमध्ये प्रभू रामचंद्र तसेच हिंदू देवतांचा आवमान ज्ञानेश महाराव यांनी केल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. यांच्या विरोधात कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. संबंधित वक्त्याला कोल्हापुरी पायतानाचा प्रसाद देऊ असे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सुनावलं आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलीसांनीही खबरदारी घेतली आहे.
ट्रेंडिंग बातमी - हर्षवर्धन पाटील लढणार की माघार घेणार? इंदापूर विधानसभा कोणाच्या पारड्यात?
नवी मुंबई इथल्या वाशीत झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात महाराव यांनी भाषण केलं होतं. या भाषणातले काही मुद्दे हे सोशल मीडियावर वायरल झाले होते. त्यावरून आरोप करत कोल्हापूरच्या हिंदुत्वादी संघटनांनी महाराव यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार लक्ष्मीपुरी पोलिसात कोल्हापुरात महाराव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना आता अटक होते की नाही हे पाहावं लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world