
राकेश गुडेकर, प्रतिनिधी
Whale Fish Vomiting Smuggling Crime : रत्नागिरी जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. व्हेल माशाच्या उललीची तस्करी करणाऱ्यांवर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. तस्करांनी एका कारमध्ये कोट्यावधी रुपये किंमतीची 4 किलो 833 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी लपवली होती. परंतु, दापोली येथील सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाने या कारचा पाठलाग करून ती कार दापोली बस स्थानकात थांबवली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या कारची झडती घेतली आणि यात असलेली व्हेल माशाची उलटी जप्त केली.
याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. युवराज मोरे (मुंबई), संजय धोपट(दाभोळ) निलेश साळवी(रत्नागिरी),सिराज शेख (मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
दापोली बसस्थानकात कार थांबवली अन् अधिकाऱ्यांनी घेतली झडती
मिळालेल्या माहितीनुसार,काल शुक्रवारी व्हेल माशाच्या उलटीची व्रिक्री करण्याचा काही जणांचा प्लॅन होता. त्यानुसार कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून संशयीत कारचा पाठलाग केला. ही कार दापोली बसस्थानकात थांबवून त्या कारमध्ये असलेली व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली.तसच कारमधील चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्याकडे असलेला मुद्देमाल जप्त केला. आरोपींना चौकशीसाठी दापोली येथील कस्टम्स कार्यालयात आणण्यात आले आणि त्यांच्याकडून यासंबंधीत माहिती उघड करण्यात आली.
नक्की वाचा >> थांबा जरा..तुम्हीही GPS चा वापर करून वाहन चालवताय? Google मॅपने चालकाला दाखवला सर्वात खतरनाक रस्ता
याप्रकरणी संशयित युवराज मोरे (मुंबई), संजय धोपट(दाभोळ), निलेश साळवी(रत्नागिरी), सिराज शेख (मुंबई) यांचेविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.यापैकी संजय धोपट हे दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक अतुल पोतदार,निरीक्षक प्रतीक अहलावत,रमणिक सिंग,मुख्य हवालदार सुहास विलणकर,करण मेहता,प्रशांत खोब्रागडे,गौरव मौऱ्या, हेमंत वासनिक यांनी याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारला.दरम्यान, संशयित आरोपीना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नक्की वाचा >> 'अदिना मशीद नाही..हे तर आदिनाथ मंदिर', भाजपने युसूफ पठाणला दिलं थेट उत्तर, व्हायरल पोस्टमुळे खळबळ!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world