जाहिरात

Dadar Kabutarkhana News: 'गरज पडली तर शस्त्रंही उचलू..', जैन मुनींची धमकी, न्यायालयालाही आव्हान

येत्या 13 तारखेपासून जैन समाज उपोषणाला बसेल असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला आहे. 

Dadar Kabutarkhana News: 'गरज पडली तर शस्त्रंही उचलू..', जैन मुनींची धमकी, न्यायालयालाही आव्हान

मुंबई: मुंबईतील कबुतरखान्यांचा मुद्दा वाद सध्या चांगलाच गाजत आहे. मुंबईमधील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाद्य टाकू नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून जैन समाजातील व्यक्ती कबुतरांना खाद्य टाकत असल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हेतर आता जैन समाजाने उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. येत्या 13 तारखेपासून जैन समाज उपोषणाला बसेल असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला आहे. 

Dadar kabutar Khana News: कबुतरखान्यावरुन दादरमध्ये राडा! जैन समाज आक्रमक, ताडपत्री हटवली, तोडफोड केली

"सरकारच्या आदेशानंतर पक्षांना खाद्य टाकणे सुरू झाले आहे. निवडणूका समोर ठेऊन हे सर्व सुरु झाले आहे. आमचे पर्युषण पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. 13 तारखेला आम्ही याबाबतचा निर्णय घेऊ. आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहोत.१३ तारखेनंतर कबुतरे बंद करण्याच्या निर्णयाविरोधात जैन समाज उपोषणाला बसेल, "असा इशारा निलेशचंद्र विजय यांनी दिला आहे.

तसेच "जैन समाज शांतताप्रिय आहे. शस्त्र उचलणे आमचं काम नाही. त्या आंदोलनावेळी शस्त्र उचलले, मात्र जे लोक शस्त्र उचलतात, ते आमचे नाहीत. पण गरज पडली तर आम्ही धर्मासाठी शस्त्रं पण उचलू. आम्ही भारताच्या संविधानाला मानतो ना, कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना. पण आमच्या धर्माच्याविरोधात आलं तर आम्ही कोर्टालाही मानत नाही, अशी धमकीही त्यांनी यावेळी दिली. 

Dadar Kabutarkhana Controversy: दादर कबुतरखाना पुन्हा सुरू होणार, कबुतरांना खायला घालता येणार

दरम्यान," पालिकेने, कोर्टाने आणि प्रशासनाने आम्हाला नाकारल तर आम्ही आंदोलन करतो.जीव दया आमच्या धर्मात आहे, जैन धर्माला लक्ष का के जात आहे? आम्ही पालिकेकडे खाद्य द्यायला परवानगी मागितली आहे. आम्ही पुन्हा इथेच आंदोलन करू, देशातील जैन धर्म येथे येतील. मी एकटा बसणार नाही देशभरातील लाखो जैन बांधव इथेच शांतिपूर्वक आंदोलन करणार आहोत.मुंगीपासून ते हत्तीपर्यंत कोणताही जीव मरता कामा नये हे आमच्या धर्मात लिहिलं आहे," असंही ते पुढे बोलताना म्हणाले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com