
Dahi Handi 2025: येत्या शनिवारी दहीहंडीचा उत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मुंबई, पुण्यासह सर्व शहरांमध्ये दहीहंडीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही दहीहंडीची जोरदार तयारी करण्यात आली असून वाहतूकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या बंद केलेले रस्ते आणि पर्यायी मार्ग.
दहीहंडी उत्सवासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील ५ मुख्य चौक संध्याकाळी 4 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी १७ पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. गोपाळकाल्याच्या निमित्ताने शहरात अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. उद्या शनिवारी सायंकाळी हे कार्यक्रम टीव्ही सेंटर, बजरंग चौक, कॅनॉट प्लेस, गुलमंडी अशा विविध भागात पार पडणार आहेत.
Mumbai News: ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स' स्वप्न लवकरच पूर्ण होणार: CM फडणवीसांचा निर्धार
हे चौक असणार बंद...
1) टीव्ही सेंटर चौक व परिसर : साक्षी मंगल कार्यालय, हडको कॉर्नर, जिजाऊ चौक आणि आयपी मेस ते टीव्ही सेंटर.
2) कॅनॉट प्लेस व परिसर : एचडीएफसी बँक एटीएम चौक, बॉम्बे स्टेशनरी, वायझेड फोर्ड शोरूम सिडको रस्ता ते कॅनॉट
3) गजानन महाराज मंदिर चौक व परिसर
पटियाला बँक ते गजानन महाराज मंदिर चौक, जवाहरनगर पोलिस स्टेशन समोर आदिनाथ चौक ते गजानन महाराज मंदिर चौक.
4) कोकणवाडी चौक व परिसर पंचवटी चौक ते कोकणवाडी चौक, वेदांतनगर ते कोकणवाडी चौक
5) गुलमंडी परिसर पैठण गेट ते गुलमंडी, औरंगाबाद बुक डेपो ते गुलमंडी
Maharashtra Politics: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हादरा! कोकणातील बडा नेता भाजपच्या गळाला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world