
Mumbai Police E Challan On Dahi Handi Festival 2025: राजधानी मुंबईमध्ये दहिहंडीचा सण मोठ्या जल्लोषात, उत्साहात पार पडला. अनेक मानांच्या हंड्या फोडण्यासाठी हा थरार अनुभवण्यासाठी गोविंदांसह मुंबईकरही घराबाहेर पडले होते. या उत्साहादरम्यान मुंबई पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांना चांगलाच दणका दिला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून एकाच दिवसात कोट्यवधींचा दंड वसूल केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दहीहंडीनिमित्त, मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली. एकाच दिवसात पोलिसांनी 10, 051 ई-चालान जारी केले. या चलानांमधून सुमारे १.१३ कोटी (१,१३,५७,२५० रुपये) दंड वसूल करण्यात आला आहे. दहीहंडीमध्ये सर्वाधिक गुन्हे हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे, दुचाकीवर तीन जण बसणे आणि वेगाने गाडी चालवणे यांसारखे होते. उत्सवाच्या गर्दीला पाहता, वाहतूक सुरळीत राहावी आणि अपघात टाळता यावेत यासाठी पोलिसांनी शहरात अतिरिक्त कर्मचारी तैनात केले.
Dahi Handi 2025 Death : दहीहंडीच्या उत्साहावर काळी सावली, 2 गोविंदांचा मृत्यू, 210 जणं जखमी
जमिनीवरील तैनातीसोबतच, वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरही लक्ष ठेवले. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये आणि रस्त्यांवर बसवलेल्या कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून, अनेक नियम मोडणारे पकडले गेले आणि त्यांना ई-चालान पाठवण्यात आले. पोलिसांचे म्हणणे आहे की अधिक चालान जारी केले जात आहेत.
पोलिसांनी इशारा दिला आहे की. उत्सवादरम्यान गर्दी आणि निष्काळजीपणामुळे रस्ते अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई सुरूच राहील. अधिकाऱ्यांनी लोकांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याचे, वेगमर्यादेचे पालन करण्याचे, चुकीच्या बाजूने गाडी चालवू नका आणि दुचाकीवर तीन जणांना घेऊन जाऊ नका असे आवाहन केले आहे.
Mumbai News: दहिहंडी सराव जीवावर बेतला, 11 वर्षीय मुलाचा 6 व्या थरावरून कोसळून मृत्यू
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world