Datta Jayanti 2025: दत्त जयंतीचा उत्साह महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पाहायला मिळतो आहे. यंदाच्या दत्त जयंतीला एक वेगळा योग जुळून आला आहे. यंदाची दत्त जयंती ही गुरुवारी आली आहे. 2014 नंतर पहिल्यांदा दत्त जयंती ही गुरुवारी आली आहे. गुरुवार हा दत्तात्रेयाचा वार मानला जातो. त्यातच गुरुवारी म्हणजेच 4 डिसेंबरला या वर्षातला शेवटचा सुपरमून आहे. यामुळे यंदाची दत्त जयंती ही विशेष असल्याचं दत्त संप्रदायातील सगळ्या भाविकांचे म्हणणे आहे.
नक्की वाचा: दत्त जयंतीची तारीख, पूजा, तिथी, शुभ मुहूर्त आणि उपवासाची महत्त्वाची माहिती
अक्कलकोटमध्ये भाविकांचा महासागर
दत्त जयंतीच्या निमित्ताने अक्कलकोट देवस्थान भाविकांनी फुलून गेले आहे. अक्कलकोट मंदिराबाहेर पहाटेपासून लांबलचक रांग लागली आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात इथूनही मोठ्या संख्याने भक्त अक्कलकोटला आले आहेत. पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर इथे दत्त जन्म सोहळा साजरा करण्यात येत आहे. बुधवारी 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी, 'दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा'च्या जयघोषात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी नारायणपूरच्या मंदिरात दत्तजयंती सोहळा एक दिवस आगोदर साजरा केला जातो.
नक्की वाचा: त्रिमूर्तींचा आशीर्वाद मिळो! दत्त जयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा मंगलमय शुभेच्छा
मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
दत्त जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यातील बहुसंख्य नेतेमंडळींनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.